लोकसत्ता प्रतिनिधी
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
ठाणे: ठाणे भिवंडी मार्गावरील यशस्वी नगर भागात मंगळवारी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला मागून येऊन एका रिक्षाने जोरदार धडक दिली. या घटनेत रिक्षाचालक किरण हौसलमल (३३) हे जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला आहे.
किरण हौसलमल हे मध्यरात्री १ वाजता त्यांची रिक्षा घेऊन कापूरबावडी येथून भिवंडीच्या दिशेने जात होते. रिक्षा यशस्वी नगर परिसरात आली असता रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला रिक्षाने जोरदार धडक दिली. त्यामुळे रिक्षाचा चुराडा झाला. किरण हे रिक्षातच अडकून होते. अग्निशमन दलाच्या जवांनानी त्यांना रिक्षातून बाहेर काढले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
First published on: 20-06-2023 at 11:12 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw driver injured in horrific accident in thane dvr