कचऱ्याच्या ढिगावर बसून आंदोलन, अस्वच्छतेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने कल्याण पालिकेचा केला निषेध | Loksatta

कचऱ्याच्या ढिगावर बसून आंदोलन, अस्वच्छतेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने कल्याण पालिकेचा केला निषेध

कल्याण पूर्वेतील महात्मा फुले नगर, सुचकनाका भागातील कचरा गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कामगारांकडून उचलला जात नाही.

कचऱ्याच्या ढिगावर बसून आंदोलन, अस्वच्छतेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने कल्याण पालिकेचा केला निषेध

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. पालिकेकडून नियमित कचरा उचलला जाऊनही शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. आरोग्याच्या प्रश्न यामधून निर्माण होत आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने सोमवार पासून कल्याणमध्ये कचऱ्याच्या ढिगावर बसून आंदोलन सुरू केले आहे.

गेल्या चार वर्षापासून पालिकेत नवीन आयुक्त आला की फक्त कचऱ्याच्या मोहिमा राबवितो. त्यामधून फलनिष्पत्ती काही होत नाही. कचरा निर्मूलनासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना कराव्यात. केवळ दिखाव्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवू नयेत असे सामाजिक कार्यकर्ता मनोज वाघमारे यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील महात्मा फुले नगर, सुचकनाका भागातील कचरा गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कामगारांकडून उचलला जात नाही. या परिसरात कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. अशा साठणाऱ्या कचरा व घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. शिवाय रोगराई पसरण्याची भीतीही रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सूचक नाका परिसरातील महात्मा फुले नगर या भागात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीवासीय राहतात. उच्चभ्रू लोकवस्ती, सोसायट्यांमध्ये कचरा नियमित वेळेत उचलला जातो.

हेही वाचा : कल्याणमधील टिटवाळ्याजवळ विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला ; दोन अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल

अशा भागात स्वच्छता कायम राखली जाते. मात्र झोपडपट्ट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते ? झोपडपट्ट्यांमध्ये माणसे राहत नाहीत का ? या भागातला कचरा व घाण का उचलली जात नाही ? हा भेदभाव का केला जातो ? आम्हीही करदाते नागरिक आहोत, आम्हालाही नागरी सेवा व सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत, कचरा व घाण वेळेत उचलली जाऊन साफसफाई देखील रोजच्या रोज करण्यात आली पाहिजे, अशी या भागातील रहिवाशांची मागणी आहे. वारंवार तक्रारी करूनही पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर याच परिसरात राहणाऱ्या मनोज वाघमारे या जागरूक रहिवाशाने सोमवारी कचऱ्याच्या ढिगावर बसून अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कल्याणमधील टिटवाळ्याजवळ विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला ; दोन अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

कल्याण डोंबिवली पालिका निवृत्त अधिकाऱ्याच्या बांधकामाला जिल्हा परिषदेची बनावट मंजुरीची कागदपत्रं; ‘ईडी’, विशेष तपास पथकाकडे तक्रार
बदलापूर: रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटली; नागरिकांत संताप
ठाणे: संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवावरून अखिल भारतीय नाट्य परिषदेचा महापालिकेवर आरोप; शिंदे-ठाकरे गटाचीही किनार?
ठाणे: कामे निकृष्ट दर्जाची झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा
बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी ठाण्यातून एकास अटक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
साई रिसॉर्ट कारवाई प्रकरण : ‘त्या’ सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, सोमय्यांची याचिकेद्वारे मागणी
Video: ‘मेरा दिल ये पुकारे…’ ट्रेंडच्या नादात माधुरी दीक्षितने केली पाकिस्तानी मुलीची कॉपी, नेटकरी संतापले
विश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले? रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का?
काँग्रेस विरुद्ध काँग्रेस: “मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही…”; CM गेहलोत यांच्या ‘गद्दार’ टीकेवरुन सचिन पायलट यांचं भावनिक विधान
ICC Player of the Month: नोव्हेंबर महिन्यासाठी जोस बटलरसह ‘या’ दोन खेळाडूंना मिळाले नामांकन, एकाही भारतीयाचा समावेश नाही