लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाईंदर: भाईंदर पूर्व येथील नवघर भागात नागरी वस्ती असलेल्या एका इमारतीचा सज्जा मध्य रात्री कोसळ्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र सुरक्षेच्या दुष्टीने संपूर्ण इमारत पालिका प्रशासनाने मोकळी केली आहे.

भाईंदर पूर्व येथील मानव कल्याण रुग्णालय शेजारी भानू पाल नावाची जवळपास ३५ वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीत एकूण २४ खोल्या व काही दुकानें आहेत. इमारत जुनी झाली असल्यामुळे ती धोकादायक स्थितीत आली होती. याबाबत महापालिकेने इमारतीधाराकांना दोन वेळा इमारत मोकळी करण्याची नोटीस देखील बजावली आहे. मात्र तरी देखील येथील रहिवासी इमारत मोकळी करण्यास टाळाटाळ करत होते.

आणखी वाचा-ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात लागू; शहराचा विभागवार पंधरा दिवसातून एकदा पाणी पुरवठा बंद राहणार

दरम्यान शुक्रवारी मध्य रात्री या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानाजवळचा सज्जा रस्त्यावर कोसळला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर पालिका प्रशासनाने घटना स्थळी धाव घेऊन संपूर्ण इमारत मोकळी केली. सध्या इमारती मधील नागरिकांना पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ठेवले असून इमारती बाबत पुढील निर्णय घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती प्रभाग क्रमांक ३ चे प्रभाग अधिकारी राजाराम कांबळे यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Structure of building collapsed in middle of night in bhayander mrj