डोंबिवली: शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने डोंबिवली-कल्याण बंदचे आवाहन केले आहे. आज सकाळपासूनच डोंबिवली कल्याण शहरातील व्यवहार नियमितपणे सुरू झाले आहेत. रिक्षा बस वाहतूक सुरळीत सुरू आहे. बाजारपेठा नेहमीप्रमाणे उघडण्यात आल्या आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा संघटनेने आम्ही या बंदमध्ये सामील होणार नाही असे जाहीर केले आहे. तर ज्यांना या बंदमध्ये सामील व्हायचे आहे त्यांनीच सामील व्हावे. कोणावर सक्ती केली जाणार नाही असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. त्यामुळे हा बंद किती यशस्वी होतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
First published on: 17-12-2022 at 09:29 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare controversial statement case dombivli kalyan turns back on close and resumes regular work tmb 01