ठाणे : भिवंडी येथील निजामपूरा भागात सिगारेट मागितली म्हणून एका तरुणाला चाकूने भोसकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तरुण जखमी असून त्याच्यावर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “माझे संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न”, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा, दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता आरोप

u

भिवंडीतील निजामपूरा भागात २९ वर्षीय जखमी तरुण वास्तव्यास आहे. रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तो राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) आगारात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचे तीन मित्र त्याठिकाणी उपस्थित होते. यातील एकाकडे त्याने सिगारेटची मागणी केली. याचा राग आल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादात दुसऱ्या एका मित्राने तरुणाला पोटात भोसकले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.