ठाणे : आनंदाश्रमासमोर शिवसैनिकांचा जल्लोष | Thane Cheering of Shiv Sena in front of Anandashram in thane amy 95 | Loksatta

ठाणे : आनंदाश्रमासमोर शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्याने ठाण्यातील ठाकरे गटाने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंद आश्रमाजवळ फटाके आणि मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला.

ठाणे : आनंदाश्रमासमोर शिवसैनिकांचा जल्लोष
आनंदाश्रमासमोर शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्याने ठाण्यातील ठाकरे गटाने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंद आश्रमाजवळ फटाके आणि मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला. जल्लोष करण्यापूर्वी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

हेही वाचा >>> बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी उच्च न्यायालयाने शिंदे गटाला धक्का देत शिवसेनेस दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सध्या विस्तव जात नाही. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाने आनंद आश्रमावर ताबा मिळविली आहे. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गटाने आनंद आश्रमात जल्लोष साजरा केला. या जल्लोषापूर्वी केदार दिघे हे आनंद आश्रमातही गेले होते. हा सत्याचा विजय असल्याचे दिघे म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-09-2022 at 20:10 IST
Next Story
बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन