गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर ते ठाणे किंवा नवी मुंबई हा प्रवास मनस्ताप देणारा ठरू लागला आहे. डोंबिवलीजवळच्या काटई नाक्यापासून पलावा हे अवघे काही मीटरचे अंतर पार करण्यासाठी तासनतास खर्ची घालावे लागतात. त्यात काटई ते बदलापूर राज्यमार्गावर पुन्हा खड्डे उगवल्याने प्रवाशांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागतो आहे. काटई नाक्यापासून ते थेट बदलापुरपर्यंत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे प्रवास जीवघेणा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षात बदलापूर, अंबरनाथ या शहरांच्या विस्तारीत भागात, खोणी, नेवाळी या गावांच्या शेजारी आणि वेशीवर गृहसंकुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बदलापूर काटई राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढली आहे. ठाणे नवी मुंबई किंवा मुंबईला जाण्यासाठी काटई – शिळफाटा या रस्त्याचा सर्वाधिक वापर होतो. एकीकडून बदलापूर, अंबरनाथ तर दुसरीकडे कल्याण आणि डोंबिवली भागातून काटई नाका येथे वाहनांची गर्दी एकटवते. त्यामुळे काटई भाग वर्दळीचा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे रस्त्याच्या कॉंक्रिटीकणाचे काम सुरू आहे. त्यातच उर्वरित रस्त्यावर खड्डे पडल्याने येथील प्रवास वेळखाऊ झाला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत काटई ते शिळफाटा या भागात वाहतूक कोंडी होती. पलावा परिसरातील अरूंद उड्डाणपूल या कोंडीत भरर घातल असतो. मात्र अंबरनाथ आणि बदलापूर शहरातून या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दुहेरी त्रासाचा सामना करावा लागतो आहे.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane the road from katai naka near dombivali to palava is very bad msr
First published on: 18-08-2022 at 09:45 IST