ठाणे: कळवा येथील वाघोबा नगर भागात रविवारी रात्री एका विहीरीमध्ये शहादूर कनोजिया यांचा मृतदेह आढळला. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाघोबा नगर येथे महालक्ष्मी चाळ आहे. याच परिसरात राहणाऱ्या शहादूर कनोजिया यांचा येथील विहीरीमध्ये रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळला.

हेही वाचा… भांडणाच्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण

घटनेची माहिती कळवा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहीरीतून मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणाचा अधिक तपास कळवा पोलीस करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The dead body of shahadur kanojia was found in a well in waghoba nagar area of kalwa on sunday night dvr