scorecardresearch

Premium

भांडणाच्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

young man reduce crowd scene fight beaten up thane
भांडणाच्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण (प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाणे: नितीन कंपनी भागात रविवारी दोन गटामध्ये वाद सुरू होते. येथील जमाव हटकण्यासाठी गेलेल्या तरूणालाच तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

पाचपाखाडी येथील टेकडी बंगला भागात मारहाण झालेला तरूण राहातो. त्यांचा बांधकामाच्या ठिकाणी मजुर पुरविण्याचा व्यवसाय आहे. रविवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तो नितीन कंपनी येथील सेवा रस्त्याजवळ मित्राला भेटण्यासाठी त्याच्या कारने गेला होता. त्यावेळी तिथे दोन गटामध्ये वाद सुरू होता. तसेच त्याठिकाणी मोठी गर्दी जमली होती. तरूण तात्काळ कारमधून खाली उतरला. तसेच ‘गर्दी करू नका’ असे जमावाला समजावत होता. त्याचा राग आल्याने येथील तीन ते चार जणांनी त्यांना लोखंडी वस्तूने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाला. तसेच एकाने त्यांच्या पोटाजवळ दगडाने मारहाण केली.

Navi Mumbai, Seize, Drugs, Worth 36 Lakhs, 4 accused, koparkhairane, Arrest, three women,
नवी मुंबई : दोन दिवसांच्या कारवाईत ३६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त, अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी तीन महिला
two men beaten to death by mob in thane
चोर असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू, अंबरनाथ शहरातील प्रकार, गुन्हा दाखल
suresh wadkar pa threatened and demand for extortion money of rs 20 crores in land case
नाशिक: गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणात २० कोटींच्या खंडणीची मागणी – स्वीय सहायकास धमकी
evm unit stolen from tehsil office in pune district
सासवडमधील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र चोरीला; सगळा प्रकार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांत कैद

हेही वाचा… मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चारजण जखमी

दरम्यान, त्यांचा मित्र त्याठिकाणी आला असता, मारहाण करणारे तेथून पळून गेले. तरूणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The young man who went to reduce the crowd at the scene of the fight was beaten up in thane dvr

First published on: 04-12-2023 at 10:33 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×