लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: तीन हात नाका उड्डाणपूलावर बुधवारी सांयकाळी वाहन बंद पडल्याने तीन हात नाका उड्डाणपूल ते मुलुंड टोलनाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. सुमारे तासाभराने वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बंद पडलेले वाहन रस्त्यामधून बाजूला केले. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून दररोज हजारो वाहने मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतूक करतात. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारी एक मोटार तीन हात नाका उड्डाणपूलाच्या पायथ्याशी अचानक बंद पडली. या बंद पडलेल्या वाहनामुळे वाहनांचा भार वाढला होता. त्यामुळे तीन हात नाका उड्डाणपूल ते मुलुंड टोलनाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा… ठाण्यात नालेसफाईच्या कामांना अखेर सुरुवात; एका महिन्यात कामे उरकण्याचे पालिका आणि ठेकेदारांपुढे आव्हान

अवघ्या पाच ते दहा मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना २० ते २५ मिनीटे लागत होती. त्यामुळे मुंबईहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. सुमारे तासाभरानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने मोटार रस्त्यामधून बाजूला केली. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on eastern expressway thane due to vehicle breakdown dvr