ठाणे : लोकशाहीमध्ये टिका करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतून उत्तर मिळाले आहे, अशी टिका चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील कोरम माॅलमध्ये सोमवारी रात्री ठाणे जिल्हा सखल हिंदू समाज, रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाऊंडेशन यांच्यावतीने द केरला स्टोरी या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यावेळी चित्रपटाचे निर्माते विपुल शहा उपस्थित होते. आम्ही हा चित्रपट चांगल्या हेतूने तयार केला. देशात दहशतवादाचे जाळे तयार करून मुलींना फसविले जात आहे. ते आम्ही या चित्रपटातून उघड केल्याचे शहा म्हणाले.

चित्रपटाला काहीजण विरोध करतात. आम्हाला त्या राजकारणामध्ये पडायचे नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकास टिका करण्याचा हक्क आहे. परंतु चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतूनच त्यांना उत्तर मिळाले आहे, अशी टिकाही शहा यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vapul shah comments on the opposition to the film the kerala story amy