लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर सिमेंट मिक्सर वाहन उलटले. या वाहनातील तेल रस्त्यावर सांडल्याने पूलावर वाहतुक कोंडी झाली आहे. वाहन चालकांनी उड्डाणपूलाखालील किंवा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन ठाणे वाहतुक पोलिसांनी केले आहे.

कापूरवाबवडी उड्डाणपूलावरून दिवसाला हजारो जड-अवजड तसेच हलकी वाहने नाशिक, भिवंडी आणि मुंबईच्या दिशेने वाहतुक करत असतात. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथील वळण मार्गावर सिमेंट मिक्सर वाहन उलटले. तसेच वाहनामधील तेलही मोठ्याप्रमाणात रस्त्यावर सांडले आहे. घटनेची माहिती ठाणे वाहतुक पोलिसांच्या कापूरबावडी कक्षाला मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

आणखी वाचा-दिवा येथील ठाणे पालिकेच्या कचराभूमीवर बेकायदा चाळी

अपघातग्रस्त वाहनाला क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरून बाजूला काढण्याचे प्रयत्न पथकांकडून सुरू आहे. तसेच तेल सांडल्याने येथील वाहतुक एकेरी मार्गे सुरू आहे. सायंकाळी घोडबंदर येथून मुंबई, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांचा भार अधिक असतो. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांना उड्डाणपूलावरील मार्गावरून वाहतुक करण्याऐवजी उड्डाणपूलाखालील किंवा पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle overturned on kapurbawadi flyover police appeal to use alternate route to avoid gridlock mrj