Daily Numerology Predictions 13 October 2025 : अंकशास्त्राच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, भाग्य आणि भविष्य ठरवता येते. ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे ग्रह, तारे महत्त्वाचे मानले जातात, त्याचप्रमाणे अंकशास्त्रातही संख्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार व्यक्तीची रास असते, त्याचप्रमाणे प्रत्येक अंकानुसार अंकज्योतिषशास्त्रात एक मूलांक ठरलेला असतो. तर हा मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. म्हणजेच उदाहरणार्थ, ३, १२ किंवा २१ जर तुमची जन्मतारीख यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ३ आहे. तर आजचा दिवस १ ते ९ मूलांकासाठी कसा जाणार जाणून घेऊयात…

मूलांक १ – jansatta.com वर दिलेल्या माहितीनुसार स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर काही काळापासून रखडलेली कामे पुढे सरकतील, प्रश्न हळूहळू मार्गी लागतील. त्यामुळे आज अनावश्यक वाद टाळा, जमीन किंवा मालमत्तेसाठी प्रयत्न करण्याची हीच संधी आहे. दृढनिश्चयासह धाडसी, व्यवसायिक हालचालींमुळे तुम्हाला नफा होईल. या काळात प्रेमसंबंधांच्या शक्यता उज्ज्वल आहेत.

मूलांक २ – गणेश म्हणतात की एक उच्च पदावरील व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ शकते. दिवसभर तुम्हाला दुःखी वाटेल. तुमच्या कल्पनांना विरोध होऊ शकतो; त्यामुळे खंबीर राहा. तुमची मानसिक क्षमता तुम्हाला तुमचे प्रकल्प चांगल्या प्रकारे आखण्यास मदत करणार आहे. जोडीदाराबद्दल काही गोष्टींवरून राग येईल वाटेल पण नंतर हळूहळू कमी होईल.

मूलांक ३ – सध्या तुमच्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहात. पण, तुमचा दिवस थोडा काळजीत जाईल; त्यामुळे तुमच्या आयुष्यातील योग्य वेळी योग्य दरवाजे बंद करा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होईल. पदोन्नती किंवा एखादा महत्त्वाचा व्यवसायाबाबत करार निश्चित होऊ शकतो. त्याचप्रमाणे लाडीगोडी लावणारा दिवस असणार आहे; तुमचा जोडीदार तुमचे लाड करेल.

मूलांक ४ – कामावर लक्ष केंद्रित करून जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला कल्पनेपेक्षा लवकर यश मिळेल. तुमची मुले आज शाळेतून चांगली बातमी घेऊन येतील. तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा शिगेला पोहोचेल; ज्यामुळे दिवसभर उत्साही वाटेल. जास्त वेळ काम केल्याने थकवा, अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे डोक शांत ठेवा. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या नात्यात काही चढ-उतार जाणवतील.

मूलांक ५ – आयुष्यात बारीकसारीक गोष्टी हव्या असतील तर चिकाटी ठेवा; कालांतराने गोष्टी तुमच्याकडे येतील. तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो. तुमचे स्पर्धक वेगाने त्यांच्या क्षमतेने पुढे जात आहे; अशावेळेस तुमच्या मेहनतीवर संतुष्ट रहा. त्याचप्रमाणे तुमच्यात प्रेम करण्याची प्रचंड क्षमता आहे ; असे जोडीदाराला दाखवा.

मूलांक ६ – एखाद्या चांगल्या पदासाठी स्पर्धा करण्यासाठी चांगला काळ आहे. त्यामुळे अनावश्यक वाद टाळा. तुम्ही आज पैसे कमावू शकता; फक्त अनुमानाने. तुमच्या जोडीदारापासून वेळ काढून स्वतःसाठी काहीतरी करणे महत्वाचे आहे.

मूलांक ७ – ही वेळ दुसऱ्यांच्या समस्यांमध्ये अडकण्याची नाही; स्वतःच्या समस्या सोडवण्याची आहे. आज तुमची मुले शाळेतून काही चांगली बातमी घेऊन येतील. पोटाच्या आजारामुळे तुम्हाला थोडा ताण येऊ शकतो, व्यावसायिक स्पर्धांना तोंड द्यावे लागेल. याचबरोबर जोडीदाराच्या उत्तम सहवासाचा आनंद घ्याल;

मूलांक ८ – चांगली सार्वजनिक प्रतिमा, सामाजिक संबंधांमुळे तुम्हाला समाजात एक स्थान मिळेल. दीर्घकाळाच्या ताणतणाव, अशांततेनंतर, तुम्हाला उत्साही वाटेल. प्रयत्न केल्यास लाभ होईल. एखादा प्रिय व्यक्ती थोडी दूरची वाटू शकते; हे फक्त तात्पुरते आहे, म्हणून त्यावर लक्ष केंद्रित करू नका.

क्रमांक ९ – अनावश्यक वाद टाळा. तुमचे शरीर धोक्याचे संकेत देत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा. व्यवसाय भरभराटीला येईल, चांगला नफा मिळेल. प्रेमासाठी हा दिवस चांगला असेल आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते समाधानकारक असेल.