चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून भारताने इतिहास रचला आहे. देशातील आणि जगातील कोट्यवधी जनता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले आहेत. चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर जगभरातून इस्रोवर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दक्षिण आफ्रिकेतून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. चांद्रयानाच्या मोहिमेनंतर अवकाशाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून थेट भारतीयांशी संपर्क साधल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते अंतराळातून भारत कसा दिसतो हे सांगताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंतराळातून साधला संवाद –

राकेश शर्मा हे भारतीय वायुसेनेचे पायलट होते, ज्यांना १९८४ मध्ये अंतराळात जाण्याची संधी मिळाली होते, शिवाय अंतराळातून आपल्या देशातील लोकांशी संवाद साधणारे ते पहिले भारतीय होते. राकेश शर्मा सोव्हिएत युनियनच्या सोयुझ टी- ११ मिशनचा एक भाग बनले होते. यादरम्यान त्यांनी अंतराळातूनच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संवाद साधला होता.

हेही वाचा- ऐकावं ते नवलच! मुलगा झोपेत चालत गेला १६० किलोमीटर, अनोख्या घटनेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

इंदिरा आणि राकेश शर्मा यांच्यात काय झाला होता संवाद?

राकेश शर्मा जेव्हा अंतराळात पोहोचले तेव्हा इंदिरा गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधताना म्हणाल्या, “संपूर्ण देशाचे लक्ष तुमच्याकडे आहे आणि आम्ही तुमचे अभिनंदन करतो, मला आशा आहे की यामुळे आपल्या देशाला अंतराळासंबंधी जागरुक होईल.” यादरम्यान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना त्यांच्या कठोर प्रशिक्षणाबद्दल प्रश्न विचारला, ज्याच्या उत्तरात राकेश शर्मा म्हणतात, “त्या प्रशिक्षणामुळे आज त्यांना मिशनमध्ये कमी त्रास झाला, ते प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे.”

अंतराळातून भारत कसा दिसतो?

या संभाषणाच्या शेवटी जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांना विचारले की, तुम्हाला अंतराळातून भारत कसा दिसतो? यावर शर्मा म्हणाले, “मी बिनदिक्कत सांगू शकतोकी, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा” यानंतर इंदिरा गांधी राकेश शर्मांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारतात, त्यावर, “आम्ही इथे खूप खात आहोत आणि कोणतीही अडचण नाही.” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक नेटकरी आपला देश आधीही महान होता आणि आताही महान असल्याच्या कमेंट करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After chandrayaan 3 mission what does india look like from space an old video of rakesh sharmas amazing answer to indira gandhis question is going viral jap