Ai New Trand: आजच्या डिजिटल युगात ट्रेंड्स चक्रीवादळासारखे येतात आणि जातात; पण काही ट्रेंड असे असतात की, जे लोकांच्या मनाला भिडतात, भावना जागृत करतात आणि मोठ्या प्रमाणात चर्चेत राहतात. सोशल मीडियावर अलीकडेच एका नवीन एआय ट्रेंडने जोर धरला होतो. जेमिनीच्या नॅनो बनाना आणि व्हिंटेज साडी एआय फोटो एडिट्सने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला होता. तो ट्रेंड फारसा जुना झालेला नसून, आता एआयचा नवा ट्रेंड सध्या इन्स्टाग्राम, एक्स ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. ‘Hug My Younger Self’ हा त्या फोटो ट्रेंडचा प्रकार आहे. या ट्रेंडमध्ये लोक स्वतःचा वर्तमान फोटो आणि लहानपणीचा फोटो एकत्र करून असे चित्र तयार करतात की, जणू आपण स्वतःच आपल्या बालपणीच्या रूपाला मिठी मारत आहोत. हा भावनिक क्षण एआयच्या मदतीने जिवंत केला जातो आणि त्यामुळे लाखो लोकांनी तो आपला अनुभव बनवायला सुरुवात केली आहे.

⦁ नॅनो बनाना या टूलची लोकप्रियता

गूगल जेमिनीचे नॅनो बनाना हे एआयआधारित टूल सध्या या ट्रेंडसाठी सर्वाधिक वापरले जात आहे. हे टूल वापरणे सोपे असून, काही क्लिकमध्ये हवे तसे एडिट्स करता येतात. मोबाईल अॅप किंवा डेस्कटॉपवर युजर अकाऊंट लॉग-इन करून फक्त फोटो अपलोड करायचा आणि योग्य प्रॉम्प्ट टाकायचा, एवढेच काम आहे. उरलेले सर्व काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जादूमुळे आपोआप पूर्ण होते.

⦁ हा ट्रेंड कसा करायचा?

स्टेप १ :

सर्वप्रथम तुमच्या फोनवर गूगल जेमिनी अ‍ॅप डाऊनलोड करा किंवा कृती वेबसाईटवरून करा.

स्टेप २ :

एआय इमेज जनरेटर करण्यासाठी अ‍ॅप किंवा वेबसाईटवर तुमच्या गूगल अकाउंटने लॉग इन करा.

स्टेप ३ :

तुमचा मोठेपणीचा म्हणजे करंट हाय-क्वालिटी सेल्फी आणि तुमचा बालपणीचा फोटो तयार ठेवा. दोन्ही फोटो स्पष्ट आणि चांगल्या प्रकाशात काढलेले असावेत.

स्टेप ४ :

गूगल जेमिनी अ‍ॅपवर जाऊन दोन्ही फोटो अपलोड करा. चेहरा स्पष्टपणे दिसतोय का ते पाहा, जेणेकरून एआय फीचर्स योग्य त्या रीतीने दोन्ही फोटोंचा मिलाफ (मर्ज) करू शकेल.

स्टेप ५ :

फोटो अपलोड करून झाल्यावर आता या ट्रेंडसाठी व्हायरल झालेला प्रॉम्प्ट एंटर करा –

“Using my present photo and my childhood photo, create a realistic and heartwarming image where my current self is hugging my younger self. Make sure both faces and features are preserved accurately so the resemblance is clear. The mood should express self-love, nostalgia, and warmth, with natural lighting and a soft, emotional atmosphere.”

स्टेप ६ :

प्रॉम्प्ट देऊन फोटो जनरेट करा आणि काही सेकंदांत तुमच्यासमोर तुमचा Hug My Younger Self फोटो तयार होऊन येईल

स्टेप ७ :

तयार होऊन आलेला फोटो डाऊनलोड करा आणि सोशल मीडियावर तो शेअर करा.

⦁ लोकांच्या मनाला का भिडतो हा ट्रेंड?

या ट्रेंडचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त सौंदर्यदृष्टीने आकर्षक नसून भावनिक आहे. अनेकांना आपल्या बालपणीच्या रूपाशी पुन्हा जोडल्यासारखे वाटते. स्वतःलाच मारलेली मिठी ही जणू आत्मविश्वास, आत्मस्वीकृती आणि भूतकाळाशी जुळलेले नाते पुन्हा जिवंत करते. त्यामुळे हे फोटो केवळ एडिट नसून उपचारासारखे भासतात.

⦁ उत्तम फोटोसाठी टिप्स

सध्याचा आणि बालपणीचा फोटो दोन्ही हाय-क्वालिटी व उजेडात काढलेले असावेत. ते फोटो घर, बाग, जंगल किंवा शहरी अशा विविध पार्श्वभूमी ठेवून, वेगवेगळ्या सेटिंग्स वापरून बघा. इन्स्टाग्राम स्टोरीसाठी उभा फोटो, तर पोस्टसाठी चौकोनी फॉरमॅट वापरा. प्रकाश आणि टोनमध्ये बदल करून विविध आवृत्त्या सेव्ह करा.