Anand Mahindra Viral Video : लहानपणापासून आई-वडील मुलांची प्रत्येक स्वप्न, इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटत असतात. एकवेळ स्वत:कडे एक रुपया राहिला नाही तरी चालेल, पण मुलांच्या स्वप्नांसाठी ते आयुष्याची जमापुंजी खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत. स्वत: फाटके कपडे घालतील पण मुलांना शाळा-कॉलेजसाठी नवीन कपडे घेऊन देतील. अशाप्रकारे काबाडकष्ट करून ज्या मुलाला शिकवलं, वाढवलं तो पुढे आपल्या पायावर उभा राहिला हे पाहताना आई-वडिलांना मिळणारा आनंद फार वेगळा असतो. पण, तोच मुलगा आयुष्यभर आपल्यासाठी राबलेल्या आई-वडिलांच्या आनंदासाठी जेव्हा काही करतो ते पाहून आई-वडिलांचा उरही अभिमानाने भरून येतो, त्यांना आयुष्यात समाधानी असल्याचे सुख मिळते. सध्या असाच वडील आणि लेकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेकानं आपल्या वडिलांच्या आनंदासाठी त्यांना असे काही सरप्राइज दिले, जे पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. खुद्द देशातील उद्योगपती आनंद महिंद्र यांनाही हा व्हिडीओ पाहून आनंद झाला आहे. त्यांनी स्वत: हा व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यमवर्गीयांचे गाडी खरेदी करण्याचे स्वप्न

तुम्हाला माहीतच असेल की, उच्च वर्गाप्रमाणे मध्यम वर्गातील प्रत्येकाचे स्वप्न असते की, एकदिवस श्रीमंत होऊन स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या, विशेषत: मध्यमवर्गीय लोकांसाठी ही स्वप्नं पूर्ण करणे म्हणजे एव्हरेस्टवर चढाई करण्याइतकेच अवघड असते; तरीही या वर्गातील लोक स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. अशाच एका घटनेची सध्या लोकांमध्ये चर्चा आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही समजेल की, मध्यमवर्गीयांसाठी गाडी खरेदी करणे हे स्वप्नापेक्षा कमी नसते. पण, स्वप्न जेव्हा एक मध्यम वर्गात वाढलेला मुलगा वडिलांसाठी पूर्ण करतो, तेव्हा होणारा आनंद हा फारच वेगळा आणि मनाला भावणारा असतो.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक कार शोरूम आहे, जिथे एक मुलगा त्याच्या वडिलांसाठी चक्क ‘महिंद्रा 700’ कार खरेदी करतो. आई-वडिलांसह कुटुंबातील काही लोकांसह तो शोरुमध्ये येतो, इन कॅश ही कार खरेदी करतो आणि पहिल्यांदा वडिलांच्या हातात कारची चावी देतो. यावेळी मुलाने कार खरेदी केल्यानंतर आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद हा पाहण्यासारखा होता. यानंतर तो मुलगा आई-वडिलांसह त्याच्याबरोबर आलेल्या कुटुंबातील इतरांनाही कारमध्ये बसवतो.

हेही वाचा – महिलेच्या शरीराभोवती भल्यामोठ्या अजगराने घातला विळखा अन् गिळणार तितक्यात…; पाहा काळजात धडकी भरवणारा Video

आनंद महिंद्रांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटले? (Anand Mahindra Latest Video)

हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, आम्हाला माहीत आहे की, आम्ही फक्त कार बनवण्याच्या व्यवसायात नाही तर स्वप्ने पूर्ण करण्याच्या व्यवसायातही आहोत. हेच आमच्या कार्यसंघाला आणखी कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘या गोष्टीमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळत आहे’, तर दुसऱ्याने लिहिले की, ‘कारचे दर थोडे कमी केले तर आम्ही आमची स्वप्नेही पूर्ण करू.’ तिसऱ्याने लिहिले की, ‘आज या मुलाचे वडील खूप आनंदी असतील.’ याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट करत मुलाचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra viral video son fulfills fathers dream surprises mother with car anand mahindra shared this video sjr