Anant Ambani-Radhika Merchant Wedding: भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि  एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांच्या लग्नासाठी १२ जुलै २०२४ रोजी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. अनंत आणि राधिका यांचा बहुप्रतीक्षित विवाहसोहळ्याची अतिशय शुभ सुरुवात व्हावी यासाठी अंबानी कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. त्यासाठी नीता अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने गुजरातमधील जामनगर येथील एका भव्य मंदिरसंकुलात तब्बल १४ मंदिरे बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही मंदिरे वास्तुकलेचा उत्तम नुमना असणार आहेत. अतिशय नाजूकरीत्या कोरीव काम केलेले स्तंभ, देवी-देवतांच्या मूर्ती, फ्रेस्को शैलीतील चित्रे यांनी ही मंदिरे सुशोभित केली जात आहेत. या मंदिरांतून पिढ्यान् पिढ्या कलात्मक वारशातून प्रेरित वास्तुकला पाहता येईल. त्यामुळे अनंत आणि राधिका यांच्या विवाह सोहळ्याबरोबर आता १४ मदिरांच्या या भव्य संकुलाची चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध शिल्पकारांनी यातून मंदिरनिर्मितीची कला, पुरातन पद्धती व परंपरा पुन्हा जिवंत केल्या आहेत. भारतीय वारसा, परंपरा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांच्या संकल्पनेतून हे साध्य केले जात आहे. अलीकडेच नीता अंबानी यांनी या भव्य मंदिरसंकुलाला भेट देत तेथील कारागीर आणि भाविकांशी प्रेमळ संवाद साधला. यावेळी त्यांनी कारागीरांच्या कामाची प्रशंसा केली. अंबानी कुटुंबाने गुजरातमधील जामनगर परिसरात मोतीकाहवाडी या ठिकाणी ही १४ मंदिरे बांधली आहेत.

इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेच्या घोषणेने महिंद्रांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, “इच्छा आता वास्तवात…”

या मंदिरनिर्मितीची पहिली झलक नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या सोशल मीडिया हॅण्डलद्वारे शेअर करण्यात आली आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नीता अंबानी मंदिरसंकुलात फिरत कारागीर आणि स्थानिक लोकांशी बोलताना दिसत आहेत. ही मंदिरे भारताच्या समृद्ध संस्कृती, वारसा आणि पौराणिक कथांचा पुरावा म्हणून उभी राहिली आहेत.

जामनगरमधील अंबानी कुटुंबाने बांधलेली ही मंदिरे अत्यंत सुंदर आणि स्थापत्यशास्त्रातील आश्चर्य ठरली आहेत. तसेच ती नाजूक कोरीव खांब, विविध देवतांच्या मूर्ती आणि रंगीत फ्रेस्को शैलीतील चित्रांनी सुशोभित करण्यात आली आहेत. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरने एक इन्स्टाग्राम पोस्ट करीत लिहिले की, हे मंदिरसंकुल भारताची समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख प्रतिबिंबित करते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट सध्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये व्यग्र आहेत. गुजरातच्या जामनगरमध्ये १ ते ३ मार्चदरम्यान हा सोहळा पार पडणार आहे. हा एक स्टार-स्टडेड इव्हेंट असेल; ज्यामध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटीदेखील सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान व रजनीकांत यांच्यासह अनेक लोकप्रिय भारतीय अभिनेते आपापल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी होणार आहेत. या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी सलमान खानही जामनगरला जाणार आहे. अक्षय कुमारही पत्नी ट्विंकल खन्नासोबत प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchant wedding nita mukesh ambani and family reliance constructing new 14 temples in jamnagar gujarat