भारताच्या टी-२० संघाचा उपकर्णधार व मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. नताशा स्टॅनकोविकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या तिच्या नावापुढील पांड्या हे नाव हटविल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. तसेच हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांचा घटस्फोट झाल्यास हार्दिक पांड्याला त्याची ७० टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल, असे दावे केले जाऊ लागले.

या सगळ्या चर्चा सुरू असतानाच हार्दिक पांड्याचा एक जुना एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये हार्दिक पांड्या गौरव कपूरबरोबर चर्चा करत होता. हार्दिक पांड्या त्या व्हिडीओत म्हणतोय, “मला जे पैसे मिळतात, ते मी आईच्या आणि कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावावर करतो. कारण- पुढे जाऊन मला माझ्या कमाईतील ५० टक्के हिस्सा कुणाला द्यायचा नाही.” ही गोष्ट बोलताना हार्दिकच्या डोक्यात घटस्फोटाचा विचार नक्कीच होता. कारण- जेव्हा घटस्फोट घेतला जातो तेव्हाच ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम पोटगी म्हणून द्यावी लागते.

हेही वाचा…‘मीसुद्धा एक माणूसच…’ बंद पंखा, तुटलेली खुर्ची; लोको पायलटचा हा VIDEO सांगतोय ‘त्याच्या’ केबिनची स्थिती…

पोस्ट नक्की बघा…

तर आता हेच विधान लक्षात ठेवून एका अज्ञात व्यक्तीने त्याची ५० टक्के संपत्ती आईच्या नावावर करण्याचे ठरविले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका तरुणाने घटस्फोटाला घाबरून संपत्ती आईच्या नावावर करण्याचे ठरविले आहे. कारण- व्यक्तीचे म्हणणे आहे की, आजकालच्या मुलींवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे मला माझी संपत्ती गमवायची नाही, असे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर या व्यक्तीच्या विधानाची तुफान चर्चा होत आहे. तो म्हणतोय, “आजच्या मुलींवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे. तसेच व्यक्ती म्हणतेय की त्याने गेल्या महिन्यात कॉलोरिंगवर (Coloring) रंग निवडून लाखोंची कमाई केली आणि आता ते पैसे त्याला गमवायचे नाही आहेत. कॉलोरिंगवर (Coloring) ही एक वेबसाइट आहे. कलरिंग वापरकर्त्यांना कलर एक्स्चेंजच्या आकर्षक जगात घेऊन जाते. हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक गतिशील बाजारपेठ आहे; जिथे व्यक्ती रंगांची खरेदी, विक्री आणि व्यापार करू शकतात.