एखाद्या खास दिवशी प्रेयसीला प्रपोज करताना आणि लग्नाआधी साखरपुड्यात जोडपं एकमेकांना अगंठी घालतात. तर या अंगठ्या दागिन्यांच्या दुकानातून विकत घेताना आपल्याला विविध आकाराच्या, अनेक आकर्षक रंगाच्या बॉक्समधून दिल्या जातात. तर हे आकर्षक अंगठ्यांचे बॉक्स कसे तयार केले जातात तुम्हाला माहीत आहे का? नाही, तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अंगठ्यांचे प्लास्टिकचे बॉक्स कसे तयार होतात, याची झलक दाखवण्यात आली आहे.
कारखान्यात सगळ्यात आधी मशीनद्वारे प्लास्टिकचे साचे तयार करून घेतले जात आहेत. त्यानंतर प्रत्येक साच्याला लाल रंगात बुडवून घेतले जाते आहे, तर काहींना ब्रशने रंग लावण्यात आला आहे. त्यानंतर एका मोठ्या स्टॅण्डवर या रंग लावून घेतलेल्या साच्यांना अगदी सरळ रेषेत क्लिपसह लावून घेतलं आहे. त्यानंतर काही वेळाने कामगार येतो आणि या सर्व साच्यांना स्टँडवरून खाली काढतो. कशाप्रकारे अंगठ्यांचे बॉक्स तयार केले जात आहेत एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून नक्की बघा.
हेही वाचा…‘या’ देशात विकली जाते चक्क ‘गुलाबजाम कॉफी’! पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ….
व्हिडीओ नक्की बघा :
स्टँडवरून काढून घेतलेल्या या बॉक्सना नंतर बक्कल लावून घेतलं आहे आणि अशाप्रकारे अंगठीचा बॉक्स तयार झाला आहे. या तयार झालेल्या बॉक्सला पुन्हा ब्रशने पॉलिश केलं जात आहे. त्यानंतर त्यामध्ये फेव्हीकॉल लावून घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये दागिन्यांच्या दुकानाचे लेबल लावण्यात आले आहे आणि अगदी शेवटी स्पंज तयार झालेल्या बॉक्समध्ये ठेवून दिला जात आहे आणि अशाप्रकारे आकर्षक असा अंगठीचा बॉक्स तयार करून घेतला आहे.
काही जणांना अंगठ्यांपेक्षा जास्त बॉक्सचे आकर्षण असते. हे अंगठीचा बॉक्स काही जण आपल्याजवळ नेहमी जपून ठेवतात. तर आज या व्हायरल व्हिडीओत हे बॉक्स कसे तयार केले जातात, याची झलक एका व्हिडीओ क्रिएटरने दाखवली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @smartest.worker या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘प्लॅस्टिक रिंग बॉक्स बनवण्याची प्रक्रिया’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना प्लास्टिक अंगठीचा बॉक्स तयार करण्याची पद्धत खूपच आवडली असून युजर्स त्यांच्या भावना विविध शब्दांत मांडताना कमेंटमध्ये दिसत आहेत.