Did Lara Dutta Comment On Bar Dancer: बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता तिच्या अनेक मुलाखतींमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत असल्याने तिच्या अनेक क्लिप्स सध्या चर्चेत आहेत. मात्र या दरम्यान अभिनेत्रीच्या नावावर एक एडिटेड पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे, जिथे लारा दत्ता ‘बार डान्सर्स’ वर टिप्पणी करताना दिसत आहे. यावरून अनेकांनी संताप व्यक्त केला असताना या पोस्ट्सबाबत एक वेगळं सत्य सुद्धा समोर आलं आहे. नेमकं हे प्रकरण काय, सविस्तर जाणून घेऊया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Pradeep R Rawat यांनी वृत्तवाहिनीच्या ग्राफिक पोस्टचा व्हायरल स्क्रीनशॉट त्याच्या प्रोफाइलवर शेअर केला. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, सगळ्यांना आनंदी ठेवणं हे कठीण काम आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा एक माणूसच आहेत. बारमध्ये आलेल्या प्रत्येकाला आनंदी ठेवणं हे काम एखाद्या बार डान्सरलाच जमू शकतं.

इतर यूजर्स देखील हि पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

तपासाच्या पहिल्या टप्प्यात, आम्ही ग्राफिक नीट तपासून बघितले. ग्राफिक वर ‘न्यूज 24’ असे लिहले होते. म्हणून आम्ही न्यूज 24 चे एक्स प्रोफाईल तपासले.
आम्हाला आढळले की न्यूज 24 ने त्यांच्या प्रोफाइलवर २५ एप्रिल २०२४ रोजी ग्राफिक शेअर केले होते.

इथे पोस्ट स्पष्टपणे एडिटेड असल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यावर काही बातम्या आहेत का ते आम्ही तपासले. आम्हाला झी न्यूज वेबसाइटवर एक अहवाल सापडला.

https://zeenews.india.com/hindi/entertainment/bollywood/lara-dutta-reaction-on-pm-modi-comment-on-muslim-in-rajasthan-tonk-rally-says-sabko-khush-rakhna-mushkil/2219382

अभिनेत्री लारा दत्ता हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आम्हाला यावरील इतर अनेक बातम्या देखील आढळल्या.

https://timesofindia.indiatimes.com/videos/etimes/bollywood/lara-dutta-reacts-to-pm-narendra-modis-muslim-quota-remark-if-he-has-the-courage-to-/videoshow/109568918.cms
https://www.firstpost.com/entertainment/ranneeti-actress-lara-dutta-on-pm-narendra-modis-muslim-quota-comments-ultimately-you-have-to-13763434.html

हे ही वाचा<< मत द्यायला आला आणि EVM तोडून गेला; ‘त्याचा’ Video तुफान व्हायरल, घटना खरी पण नेमकं झालं काय?

निष्कर्ष: लारा दत्ताच्या विधानाचे व्हायरल ग्राफिक एडिटेड आहे, तिने पीएम मोदींचे समर्थन केले परंतु कुठेच ‘बार डान्सर’ या शब्दाचा उल्लेख केला नाही. व्हायरल दावे खोटे आहेत