Snake Gets Electric Shock: साप म्हणजे नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर शहारा येतो… आणि जर त्यानं चक्क विद्युत प्रवाह असलेल्या कुंपणावर चढायचा प्रयत्न केला, तर? ते वाचूनच छातीत धडधड सुरू झाली ना? सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात एक साप विद्युत तारांवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र पुढे जे घडतं, ते अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारं आहे. या व्हिडीओत फक्त एक साप नाही, तर त्याच्या धाडसाचं आणि निसर्गाच्या नियमांचं भयावह चित्र उभं राहतं… आणि बघणाऱ्यांना पडतो एकच प्रश्न, “सापाला खरंच करंट बसतो का?”
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ अक्षरशः धुमाकूळ घालतोय, ज्यात दिसतोय एक साप… पण नेहमीसारखा नव्हे. हा साप थेट वीजभारित तारांवर चढण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुढच्या काही सेकंदांत जे घडतं, ते पाहून तुम्हालाही थरकाप उडेल.
व्हिडीओत दिसतं की, एक लांबलचक साप हळूहळू एका कुंपणाच्या तारांवर जाताना दिसतोय. हे कुंपण सामान्य नसून, वीजभारित असलेलं आहे. प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी हे कुंपण वीजभारित करण्यात आलं आहे. साप कुठून तरी या कुंपणावर येतो आणि वर चढण्याचा प्रयत्न करतो. तो हळूहळू पुढे सरकत असतानाच जसा तो वरच्या भागापर्यंत पोहोचतो तसा त्याला बसतो जबरदस्त झटका.
साप काही सेकंद जोरात हादरतो; पण खाली पडण्यापासून थोडक्यात वाचतो. त्यानंतरही साप हार मानत नाही. तो पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न करतो; पण पुन्हा एकदा विजेचा झटका बसल्यावर मागे सरकतो. हा संपूर्ण प्रकार एका कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या विचित्र दृश्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी पहिल्यांदाच असं दृश्य पाहिलं आणि सापालाही विजेचा झटका बसतो का, असा प्रश्न त्यांना पडला आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा एक वेगळाच अनुभव असल्याचं लोक सांगत आहेत.
नेटिझन्सच्या कमेंट्समध्ये कोणी म्हणतं, “आज कळलं की सापालाही करंट लागतो, हे तर विज्ञानाचं नवं पान आहे!” तर दुसरा लिहितो, “आजकाल मोबाईल उघडला की, काहीही बघायला मिळतं, सापाचंही विद्युत परीक्षण!”
हा व्हिडीओ केवळ गमतीशीरच नाही, तर प्राण्यांच्या वर्तनाबाबत नवा विचार करायला लावतोय. सापांना विजेचा कितपत धोका आहे? अशा प्रसंगी त्यांच्या संवेदनांवर काय परिणाम होतो? हे प्रश्नही या निमित्ताने पुढे येत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
एक मात्र नक्की की, हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा सापांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कदाचित बदलू शकतो.