अनेक स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी इतका मेकअप करतात की, कधी-कधी त्यांना ओळखता येणे कठीण होते, असाच काहीसा प्रकार एका आईसोबत घडला आहे, जिला तिचे मूल मेकअपमुळे ओळखू शकले नाही आणि तिच्यासमोरच आईची आठवण करून जोरजोरात रडू लागले, या आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाची रडण्याची आणि क्यूट स्टाइल आता सोशल मीडियावर चांगलीच पसंतीस येत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक आई तिचा मेकअप करून तयार होत असते, या वेळी तिचा लहान मुलगा तिचीच आठवण काढून रडत असतो, यावर ‘मीच तुझी आई आहे बेटा, मीच तुझी आई आहे’ असे सांगत असते. परंतु तो नाही म्हणत जोरजोरात रडत राहतो. मेकअप केल्यानंतर मुलाला त्याच्या आईला नीट ओळखता येत नव्हती, त्याची आई त्याला एवढे समजावून सांगत असतानाही तो तिला ओळखण्यास नकार देतो आणि पळून जातो. या वेळी आई मुलाच्या जवळ जाऊन बसते आणि त्याला मांडीवर घेते तेव्हा तो एका अनोळखी स्त्रीने त्याला पकडल्यासारखा रडू लागतो.
आई आणि मुलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटिझन्स त्यावर मजेशीर कमेंट करीत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर visagesalon1 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
ट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच
एका युजरने कमेंट करत लिहिले की, अशा मेकअपचा उपयोग काय आहे की ज्याने मुलाला आपली आईही नीट ओळखता येत नाही. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, त्याला त्याची साधी भोळी आई आवडते. तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘आईकडे तयारीसाठी जास्त वेळ नसतो आणि जेव्हा ती तयार होते, तेव्हा कधी-कधी अशी परिस्थिती ओढवते.’ यावर एका युजरने मजेशीर कमेंट करीत लिहिले की, ‘मुलाने ओळखले नाही तरी ठीक आहे पण मुलाच्या वडिलांनी ओळखले नाही तर गडबड होईल.’
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.