कपड्यांच्या घड्या घालणे हे काम खूप कंटाळवाणे असते. रोज लहान-मोठे असे सर्व कपडे तीन-चार फोल्ड करीत नीट घड्या घालून मग ते व्यवस्थित कपाटात ठेवायचे. हे काम करण्यासाठी खूप पेशन्स लागतात. अनेकांना कपडे घडी करण्याचा खूप कंटाळा येतो. अशा वेळी ते कपडे घडी न करताच तसेच कपाटात कोंबून ठेवतात. तुम्ही याच प्रकारातले असेल आणि तुम्हालाही रोज कपडे घडी करण्याचा कंटाळा येत असेल, तर या चिमुकल्याचा व्हिडीओ एकदा बघाच.
यात एक चिमुकला अगदी सोप्या पद्धतीने आणि स्पीडने कपडे कसे घडी करायचे हे दाखवत आहे. त्यात त्याने अवघ्या काही सेकंदांत आपले कपडे (टी-शर्ट, पॅन्ट) घडी केले आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अगदी ४-५ वर्षांचा लहान मुलगा कागदी पुठ्ठ्याच्या मदतीने कपडे घडी करतोय. कपड्यांची घडी नीट घालण्यासाठी त्याने कागदी पुठ्ठा एका खास पद्धतीने कापला आहे. तो पुठ्ठ्याच्या मध्यभागी कपडे ठेवायचा आणि पुठ्ठ्याला पकडून तो आजूबाजूने कपडे नीट फोल्ड करायचा. बस्स… एवढं झाल्यानंतर कपड्यांची घडी नीट तयार. या पुठ्ठ्याच्या मदतीने चिमुकला अवघ्या काही सेकंदांत कपडे नीट घडी घालतोय.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloth folding hacks viral have trouble folding clothes with trick it will be solved in a moment the children folding clothes easy techniques sjr