आषाढी एकादशीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलेल्या पोस्टवरुन सध्या भाजपाचे आमदार नितेश राणे आणि युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्यामध्ये सोशल मिडीयावरच बाचाबाची झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. नितेश राणे यांनी यांनी ट्विटरवरुन आषाढी एकादशीच्या दिवशी पावणेसातच्या सुमारास राहुल गांधींनी आषाढी एकादशीनिमित्त साध एक ट्वीटही केलं नसल्याचं सांगत राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं. मात्र नितेश यांच्या याच ट्विटखाली अनेकांनी राहुल गांधींच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन मराठीमध्ये आषाढीनिमित्त पोस्ट करण्यात आल्याचे स्क्रीनशॉट पोस्ट केले. यामध्ये श्रीनिवास यांनीही नितेश यांना टोला लगावत रिप्लाय दिला आणि तिथूनच या दोघांमध्ये वाद सुरु झाला.

नक्की पाहा >> Photos: “मला वाटतं त्यांचं…”; २०० जागा जिंकण्याच्या CM शिंदेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकून पिकला एकच हशा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राहुल गांधी यांनी आषाढी एकादशीनिमित्त एक ट्वीटही केलं नाही. तुम्ही सत्ता गमावली की तुमचा राज्यामधील रसही कमी होतो, असा तुमचा फंडा आहे का?”, असा प्रश्न नितेश राणेंनी ट्विटरवरुन राहुल यांना टॅग करुन विचारला होता.

या ट्विटवर श्रीनिवास यांनी रिप्लाय करत नितेश राणेंना ‘स्वस्तातील संबित (पात्रा)’ असा टोमणा मारला. “ट्वीटर म्हणजेच जग असं नाहीय. ट्वीटरच्या बाहेरही जग आहे. मेंदूच्या जागी कचरा भरलाय तो थोडा बाहेर काढ आणि दोन रुपयांच्या या ट्वीट्सच्या जागी आयुष्यात काहीतरी चांगलं काम करा,” अशा खोचक शब्दांमध्ये राहुल गांधींनी फेसबुवर आषाढीनिमित्त मराठीतून केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट पोस्ट केला.

नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आल्यानंतर नितेश राणेंचा खोचक टोला; म्हणाले, “बच्चे की जान…”

नक्की वाचा >> “…बदल्यात तुमच्या पाया पण पडू”; अजित पवारांचा Video शेअर करत निलेश राणेंचं वक्तव्य

या ट्वीटवर रिप्लाय करताना नितेश राणेंनी बरनॉल क्रीमचा फोटो पोस्ट केला. सामान्यपणे सोशल मीडियावर समोरच्या व्यक्तीचा जळफळाट होत आहे हे दर्शवण्यासाठी अशाप्रकारचे फोटो वापरले जातात. मात्र नितेश यांच्या या ट्वीटला श्रीनिवास यांनी बरनॉलच्या ट्रक्सच्या मिम्सचा फोटो रिप्लायमध्ये पोस्ट करत उत्तर दिलं. “स्वस्तातल्या संबित, सध्या तुम्ही बरनॉलचा वापर करत आहात हे देशातील लोकांना सांगितल्याबद्दल तुमचा आभारी आहे. तुमची परिस्थिती पाहता एका बरनॉलने काय होणार? आम्ही संपूर्ण ट्रक पाठव आहोत,” अशी कॅप्शन श्रीनिवास यांनी हा फोटो पोस्ट करताना लिहिली.

यावर नितेश राणेंनी रिप्लाय करत, “तुमच्याकडे हेच काम शिल्लक राहिलं आहे. पक्ष तर उरला नाहीय,” असा खोचक टोला लगावला. त्यावर श्रीवनिवास यांनी राणे कुटुंबियांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरुन भाजपा नेत्याला लक्ष्य केलं. “चार-चार पक्ष बदलणाऱ्या महा दलबदलू (लोकांनी) ‘पक्षा’वरुन ज्ञान नाही दिलं तरच योग्य ठरेल,” अशं श्रीनिवास म्हणाले. पुढे श्रीनिवास यांनी, “देशाला जाणून घ्यायचं आहे की आता तुम्ही कोणत्या पक्षात जाणार आहात?, हे देशाला सांगावं,” असा प्रश्न नितेश राणेंना विचारला.

नक्की वाचा >> फडणवीसांना ‘उपमुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या शरद पवारांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “अजित पवार…”

नितेश राणेंनीही या प्रश्नातील पार्टी या शब्दावरुन खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींचे काही आठवड्यांपूर्वी एका पबमधील व्हायरल झालेल्या फोटोंच्या पार्श्वभूमीवर नितेश यांनी, “राहुलजी ज्या पार्टीला रात्री जातात, तिथे तर बिलकुल नाही जाणार,” असा रिप्लाय दिला.

दोन्ही नेत्यांच्या व्हेरिफाइड अकाऊंट्सवरुन ही शाब्दिक देवाण-घेवाण सुरु असतानाच अनेकजण कमेंट्स करुन आपली मतंही मांडताना दिसले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader srinivas bv and bjps nitesh rane verbal fight on twitter goes viral scsg