राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर धक्कादायक राजकीय घटनाक्रमांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे, असा दावाही शिंदे-फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद दिल्याची राज्याच्या राजकारणामध्ये बरीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी यावरुन भाष्य करताना केलेल्या एका वक्तव्यावरुन निलेश राणेंनी थेट अजित पवारांचा उल्लेख करत पवार कुटुंबियांना टोला लगावलाय.

नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण एकनाथ शिंदेंनी…

पवार नेमकं काय म्हणाले?

३० जून रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवारांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे, अस यावेळेस बोलताना पवार म्हणाले.

नक्की वाचा >> फडणवीसांनी उपमुख्यंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंचं पत्र; म्हणाले “ही बढती आहे की…”

sharad pawar
‘गोविंदबागे’त जेवायला या! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण!
devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
ajit pawar and yugendra pawar and sharad pawar
‘अजित पवारांचं बंड कुटुंबातील सर्वांनाच आवडलेलं नाही,’ युगेंद्र पवारांचं विधान; म्हणाले, “कुटुंबात…”
cbi summoned akhilesh yadav in illegal mining case in uttar pradesh
अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश

“ज्यांनी पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, आता अडीच वर्षे ते विरोधी पक्षनेते होते, त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, भाजपाच्या वरिष्ठांचा व नागपूरचा हा आदेश असावा आणि नागपूचा आदेश म्हटले की तो तंतोतंत पाळावा लागतो. नागपूरचा आदेश मोडता येत नाही आणि सत्तेत जाण्याची संधी मिळाली तर, ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण म्हणजे फडणवीस होय,” असा टोलाही पवार यांनी हाणला. 

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’ प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी याबद्दल…”

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हा आश्चर्यकारक निर्णय असल्याचे ते म्हणाले. “शिवसेनेतील ३९ आमदारांचे नेतृत्व करणारे शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिकची मागणी केली असेल. त्यामुळे भाजपा नेतृत्वाने हा निर्णय घेतला असेल, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नसावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले. याचेवेळी टीका करताना पवारांनी, “देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री,” असंही म्हटलं.

नक्की वाचा >> सकाळीच आलेला अमित शाहांचा फोन, मराठा- ब्राह्मण समीकरणं अन् फडणवीसांच्या हातून निसटलेलं मुख्यमंत्रीपद; जाणून घ्या घटनाक्रम

नक्की वाचा >> “२०१९ मध्येच भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर…” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले, “आम्ही कुठे…”

निलेश राणे काय म्हणाले?
शरद पवारांच्या याच वक्तव्यावरुन महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणेंनी अजित पवारांचा उल्लेख करत टीका केली आहे. पवारांनी वक्तव्य केल्याच्या दुसऱ्या दिवशी निलेश राणेंनी ट्विटरवरुन, “पवार म्हणाले, ‘फडणवीस एकमेव माजी मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री झाले’, अजित पवार चार वेळा माजी उपमुख्यमंत्री जे एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत,” असं म्हटलं आहे.

दरम्यान, फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदावरुन बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे संजय राऊत आणि इतरही नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.