Girlfriend Boyfriend Video: प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की, ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. आजकाल गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणीही कपल्स अगदी जगाची चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही; पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात शॉपिंग मॉलमध्ये कपल अश्लील चाळे करताना दिसतायत.

त्याने मॉलमध्ये तिला किस केलं अन्… (Couple Romance Viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कपाळावर हात माराल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका शॉपिंग मॉलमध्ये एक कपल अश्लील चाळे करताना दिसतायत. ते दोघंही शॉपिंग मॉलमध्ये किस करताना दिसतायत. अगदी सगळ्यांसमोर कसलंही भान न ठेवता त्यांचे अश्लील चाळे सुरू आहेत. मॉलमधील काचेमधून त्यांचा हा अश्लील प्रकार सर्वत्र दिसून येतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @hey_paban_11 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ७० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लघवी करू शकता पण सार्वजनिक ठिकाणी किस करू शकत नाही? ढोंगी लोक” तर दुसऱ्याने “शॉपिंग मॉल की ओयो मॉल” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “असे लोकांचे व्हिडीओ काढू नका रे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple video viral boyfriend kiss girlfriend in shopping mall viral video on social media dvr