सोशल मीडियावर सध्या एक गोडसा आणि भावनिक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाचंही मन भावूक होईल इतका तो सुंदर आहे. लहान मुलांच्या निरागसतेत आणि त्यांच्या विचारांमध्ये एक वेगळंच गोडपण असतं. अगदी तसाच अनुभव या व्हिडीओतही दिसून येतोय. जिथं एका लहानग्यानं आपल्या जन्मलेल्या भावाला पाहिलं व त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, प्रश्न आणि आईचा प्रेमळ प्रतिसादया लोभस दृश्यानं सगळ्यांच्या डोळ्यांत प्रेम आणि हसू दोन्ही आणलं आहे.
हा व्हिडीओ एका हॉस्पिटलमधील क्षण दाखवतो, जिथे आई नुकत्याच जन्मलेल्या बाळासोबत बेडवर झोपलेली असते. तिच्या बाजूला तिचा मोठा मुलगाही असतो. तो आपल्या जन्मलेल्या भावाकडे एकटक बघत असतो आणि अचानक निरागसपणे विचारतो– “आई, याची मम्मा कुठं आहे? याला मम्मा नाही का?” हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं.
आई त्या निरागस प्रश्नावर हसते आणि प्रेमाने म्हणते, “मीच त्याची आई आहे रे.” हे ऐकताच लहानगा थोडा वेळ गोंधळतो आणि आपल्या जन्मलेल्या भावाकडे एकटक बघू लागतो. त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य, गोंधळ आणि गोड भाव पाहिल्यावर त्याच्याबद्दल सगळ्यांना च आपुलकी निर्माण होते. त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके गोड आहेत की, पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. हा व्हिडीओ पाहून इंटरनेटवर सगळीकडे हशा आणि कौतुकाचं वातावरण निर्माण झालं आहे.
पाहा व्हिडिओ
या व्हिडीओवर लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी लिहिलंय – “हा व्हिडीओ पाहून दिवसच उजळला.” तर काहींनी मजेत लिहिलं, “मुलगा विचार करतोय की, आता आई शेअर करावी लागेल.” काहींनी तर अगदी भावनिक होत, “बाळांचं प्रेम आणि त्यांची निरागसता जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे,” असंही म्हटलं आहे. इतर अनेकांनी हार्ट आणि लव्ह इमोजींचा वर्षाव केला आहे.
हा व्हिडीओ फक्त मजेशीर नाही, तर तो प्रत्येक घरातला एक गोड क्षण दाखवतो — जेव्हा घरात नवीन बाळ येतं आणि मोठं मूल त्याला पहिल्यांदा पाहतं. तेव्हा त्याचं त्या वेळचं प्रेम, कुतूहल आणि झालेला थोडासा गोंधळ हे सगळं या व्हिडीओत छान दिसतं. लहान मुलांची निरागसता आणि त्यांचे गोड भाव पाहून सगळ्यांनाच आपलं बालपण आठवलं आहे.
