Anaconda Viral Video: हल्ली सोशल मीडियावर असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात जे प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. आपल्या आवडीच्या प्राण्यांसोबत ते सतत कुठलेना कुठलेतरी व्हिडीओ शेअर करतात. कुत्रा, मांजर, ससा यांसारख्या काही प्राण्यांसोबत व्हिडीओ काढणं एक नॉर्मल गोष्ट आहे. पण, एखाद्या सापासोबत किंवा अजगरासोबत व्हिडीओ शूट करणं किती भयानक गोष्ट आहे. आपण अनेकदा साप हा शब्द जरी ऐकला तरी आपल्याला घाम फुटतो. पण, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओतील या पठ्ठ्याने अॅनाकोंडासारख्या भयानक सापासोबत असं काही केलं, जे पाहून तुम्हालाही दरदरून घाम फुटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर लवकर फेमस होण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही. त्यासाठी अनेकदा लोक कोणतीही भीती न बाळगता कोणतेही धाडस करतात. अनेकदा यामध्ये ते आपला जीवदेखील गमावतात. आता समोर आलेल्या या व्हिडीओमधील एक व्यक्ती चक्क अॅनाकोंडासारख्या भयानक सापाचे शूट करण्यासाठी पाण्यात उतरतो.

हा व्हायरल व्हिडीओ ब्राझीलमधील पंतनाल वेटलँड या ठिकाणी शूट करण्यात आला असून तो इन्स्टाग्रामवरील @safari.travel.idea या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती सुरुवातीला व्हिडीओमध्ये ॲनाकोंडाला दाखवत आहे. त्यानंतर ती व्यक्ती हळूहळू ॲनाकोंडाचे शरीर दाखवताना दिसतो. यावेळी अनेकदा ती व्यक्ती शूट घेण्यासाठी ॲनाकोंडाच्या खूप जवळही जाते, पण त्याचं नशीब बलवत्तर म्हणून त्याला तो ॲनाकोंडा काहीही करत नाही.

हेही वाचा: बापरे! तहानलेल्या वासरासमोर आला सहा फुटांचा साप; VIDEO पाहून नेटकरीही बिथरले

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या पेजवर कॅप्शमध्ये लिहिलंय की, “आम्ही ॲनाकोंडाचे असे शूट करण्याची शिफारस करत नाही. खरं तर, आम्ही मनुष्याला खाण्यास सक्षम असलेल्या कोणत्याही मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर पाण्यात उतरू नये असा सल्ला देऊ. पण, काही लोकांकडे ते सुरक्षितपणे करण्याचे कौशल्य असते. या व्हिडीओद्वारे सांगायचंय की, पंतनाल हे खूप मोठ्या ॲनाकोंडाचे वास्तव्य असलेले ठिकाण आहे. त्यांना उष्णकटिबंधीय पाणथळ वस्ती आवडते आणि पंतनाल ही जगातील सर्वात मोठी उष्णकटिबंधीय आर्द्रभूमी आहे. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना सापांची आवड आहे, तसेच ज्यांना जंगलात ॲनाकोंडा पाहायला आवडेल, त्यांना आम्ही पंतनालला भेट देण्याची शिफारस करतो.”

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओला आत्तापर्यंत ४.८ मिलियन व्ह्यूज मिळाले असून एक लाखांहून अनेकांनी याला लाइक केले आहे. तसेच यावर अनेक जण कमेंट्सही करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did a shoot with anaconda to become famous on social media seeing the thrilling video you will also shocked sap
First published on: 06-05-2024 at 19:26 IST