Viral Video: अनेकदा आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या मैत्रीचे गोडवे गात असतो. आपली मैत्री, त्या मैत्रीतील निस्वार्थी भावना या सगळ्याचेच आपल्याला खूप कौतुक असते. पण, अशी निखळ मैत्री अनेकदा माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त प्रामाणात असल्याचे दिसून येते. प्राण्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से, अनेक व्हिडीओ हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यावर लाखो व्ह्यूज आणि कमेंट्सही येतात. सध्या एका शेतातील वासराचा आणि सापाच्या मैत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

याआधीदेखील सोशल मीडियावर कुत्रा आणि माकड, कुत्रा आणि मांजर, साप आणि माकड यांच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. त्यात कधी हे प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात तर कधी एकमेकांची मदत करताना दिसतात. नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shetivadi या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रानात एक वासरू पाणी पिण्यासाठी थांबले असून ते पाणी पित असताना अचानक त्या पाण्यातून एक सहा-सात फुटाचा साप जाताना दिसतो. त्यावेळी ते वासरू सापाला पाहते, पण तरीही ते जागेवरून न हालता पाणी पिते, शिवाय सापही वासराला काहीही न करता पुढे निघून जातो. या व्हिडीओवरूनच लक्षात येतंय की, हे दोन्ही प्राणी खूप वेगळे असले तरीही त्यांची मैत्री किती घट्ट आहे. नाहीतर अनेकदा काही प्राणीदेखील एकमेकांना पाहून घाबरतात. पण, या व्हिडीओमध्ये तसं काहीच दिसत नाही. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने या व्हिडीओवर, “पाणी पाजायला घेऊन गेल्यावर प्राण्यांची काळजी घ्या” असं लिहिलं आहे.

हेही वाचा: जगण्याचा संघर्ष! १० वर्षाचा चिमुकला सांभाळतो फूड स्टॉल, वडिलांचे झाले निधन अन् आई….; आनंद महिंद्रांनी शेअर केला हृदयस्पर्शी VIDEO

पाहा व्हिडीओ:

परंतु, या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. त्यातील एकाने लिहिलंय की, “काही त्रास नाही त्याला, शेतकऱ्याचा मित्र आहे तो”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “ते दोन्ही जीव आपआपली कामं करत आहेत.” या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून अनेक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत.