Pune Video : पुण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी ऐतिहासिक वास्तू तर कधी प्राचीन मंदिरे, कधी पुणेरी पाट्या तर कधी पुणेकरांच्या गमती जमतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. अनेक लोक नोकरी आणि शिक्षणासाठी पुण्यात येतात आणि येथेच स्थायिक होतात. तुम्हाला पुणे शहर आवडते का? (do you ever went to this place to watch beautiful view of pune city video goes viral on social media)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा कधी पुण्यात आला तर एका ठिकाणी जाणे विसरू नका. पुण्याजवळ एक असे ठिकाण आहे, त्या ठिकाणावरून पुणे शहराचा सुंदर दृश्य पाहायला मिळते. सध्या या जागेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक उंच टेकडी दिसेल. त्या टेकडीवरून हा व्हिडीओ रॅकॉर्ड केल आहे. खाली तुम्ही घाटाचा नागमोडी रस्ता दिसेल आणि अगदी समोर पुणे शहराचे सुंदर दृश्य दिसेल. पुणे शहराचे हे नयनरम्य दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या ठिकाणावरुन पुणे शहर खूप सुंदर दिसते. या व्हायरल व्हिडीओवर लिहिलेय, “पुणे शहराचा सुंदर View” पण तुम्हाला हे ठिकाण कोणते, हे माहीत आहे का?

हेही वाचा : ती गळाभेट ठरली शेवटची! स्कूटरवर बसून मित्राबरोबर गप्पा मारताना घडलं असं की… हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “Guess करा लोकेशन..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी हा बोपदेव घाट असल्याचे लिहिलेय.

हेही वाचा : VIDEO: कोल्हापुरात आई समोरच मुलावर तलवारीने सपासप वार; पोटच्या गोळ्यासाठी आई हल्लेखोरांना भिडली, शेवटी काय झालं पाहा

हो, हा बोपदेव घाट आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून बोपदेव घाट ओळखला जातो. निसर्गरम्य ठिकाण म्हणून बोपदेव घाट लोकप्रिय आहे. अनेक लोक रोजच्या कामाचा कंटाळा आला की बोपदेव घाटाकडे धाव घेतात आणि निसर्गरम्य ठिकाणी मोकळा श्वास घेतात. पुणेकरांचे हे आवडते ठिकाण आहे. तु्म्ही या बोपदेव घाटामध्ये कधी गेला का?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you ever went to this place to watch beautiful view of pune city video goes viral on social media ndj