मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घर अत्यंत महाग असते. ज्यांच्याकडे जास्त पैसे नसत्ता ते लोक मोठ्या कष्टाने आपलं घर उभारतात. अशा परिस्थितीमध्ये शहरामध्ये अंत्यत दाटीने घर बांधली जातात.. अशा ठिकाणी घर अत्यंत लहान लहान असतात. छोट का असे पण त्यांच स्वत:च घर असते. दरम्यान सोशल मीडियावर दोन घरांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जे पाहून लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तीन मजली इमारत दिसत आहे जे फक्त ४ फूट जागेत तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच दुसरे एक घर फक्त दोन फुट जागेत उभारले असून ते दोन मजल्याचे आहे. एवढं नव्हे तर दुकान तयार केले आहे. दोन्ही घर पाहून लोकांना धक्का बसला आहे. तीन मजली घर अखेर इतक्या कमी जागेत उभारले कसे? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

हेही वाचा – कुत्रा नव्हे तर चक्क वाघाच्या गळ्यात साखळी बांधून फिरवतोय ‘हा’ चिमुकला! धक्कादायक व्हिडीओ पाहून भटकले नेटकरी..

व्हायरल व्हिडीओमधील घराबाबत एक व्यक्ती सांगता आहे की, इंजिनिअरने काय डोक वापरले आहे. ४ फुटच्या जागेत एका गल्लीमध्ये तीन मजली इमारत उभारली आहे . तुम्ही पाहू शकता की, आतमघ्ये फक्त ४ फुटची गॅलरी दिली आहे. इतक्या कमी जागेत पायऱ्या देखील आहेत.

त्यानंतर दुसरे घर देखील दिसते आहे जे पाहून लोक थक्क झाले आहेत कारण तो व्यक्ती सांगतो की ते घर फक्त २ फूट जागेत दोन मजली तयार केले आहे आणि त्यात दुकान देखील बनवले आहे.

हेही वाचा – पोटासाठी चिमुकल्याचा संघर्ष! भाकरी करताना हात भाजला अन् आई आठवली…VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

व्हायरल व्हिडीओमध्ये rk_khan_facts नावाच्या पेजवर शेअर केलेला आहेय व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” चार फुट जागेत तीन मजली घर” व्हिडीओ आतापर्यंत ५ लाथपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लोकांनी व्हिडीओवर अनेक कमेंट केल्या आहेत एका यूजरने लिहिले आहे की,” भूकंप या घराचा पत्ता विचरतो आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “दुकानेच शटर उघडल्यानंतर थेट भिंत दिसते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineer built 3 story house in space of 4 feet internet shocked snk