Pm Modi House Photo Fact Check : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडिओ आढळून आला आहे, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अलिशान घर दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडीओ त्यांच्या घरात दाराखिडक्यांना लावलेल्या पदड्यांपासून बाथरुम सीट ते बेडपर्यंत प्रत्येकाची किंमत देण्यात आली आहे. या व्हिडीओवरुन आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. पण खरंच व्हायरल व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या घरातील आहे का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर्स डॉ. शीतल मदन यांनी व्हायरल व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केला आहे.

इतर युजर्स देखील समान दाव्यांसह तोच व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

या व्हिडिओचा मुख्य स्त्रोत आम आदमी पक्षाचा एक्स हँडलवर आढळून आला आहे.

कॅप्शनमध्ये, या हँडलने व्हिडिओ पोस्ट करताना कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला नाही.

व्हिडिओ खूपच स्पष्ट आणि स्मूथ दिसत आहे; त्यामुळे, हे स्पष्ट होते की, हा व्हिडीओ एआय-जनरेटेड आहे,

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड केला आणि अनेक कीफ्रेम्स मिळवल्या.

काही कीफ्रेममध्ये ओपन एआय लोगो होता, ज्यामुळे असे सूचित होते की, व्हिडिओ ‘सोरा’ वापरून बनवला गेला असावा (सोरा हे ओपनएआयचे व्हिडिओ जनरेशन मॉडेल आहे, जे टेक्स्ट, इमेज आणि व्हिडिओ इनपुट घेण्यासाठी आणि आउटपुट म्हणून एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे).

त्यानंतर आम्ही व्हिडिओ २० सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये विभागला आणि तो एचआयव्ही (HIVE) मॉडरेशनद्वारे तपासून पाहिला.

या डिटेक्टरला व्हिडिओ एआय-जनरेटेड असल्याचे आढळून आला.

निष्कर्ष:

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अलिशान घर असल्याच्या दाव्यांसह शेअर केला जाणारा व्हिडिओ एआय-जनरेटेड आहे. त्यामुळे व्हायरल दावे खोटे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check video ai generated video shared as that of indian pm modis residence sjr