Viral Video Bihar People Chasing Away BJP Leaders : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये काही लोक हातात काठ्या घेऊन एका वाहनावर हल्ला करताना दिसत होते. हा व्हिडीओ बिहारमधील असून, लोक भाजप नेत्यांना पळवून लावत असल्याचा दावा करण्यात आला होता. पण, तपासादरम्यान, आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ बिहारमधील नसून इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील आहे.

काय होत आहे व्हायरल?

@ethisundar ने हा व्हिडीओ त्याच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास…

आम्ही व्हिडीओमधून घेतलेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

आम्हाला इंडोनेशियाच्या एका वेबसाइटवरील लेखात एक स्क्रीनशॉट मिळाला, जो २६ ऑगस्ट २०२५ रोजी अपलोड करण्यात आला होता.

Detik-Detik Menegangkan ASK Nyaris Jadi Korban Amukan Massa dalam Demo Ricuh DPR, Mobil Mewahnya Dihancurkan

कॅप्शनमध्ये म्हटले होते की, २५ ऑगस्ट २०२५, सोमवारी सेंट्रल जकार्तामधील DPR/MPR इमारतीसमोरच्या आंदोलनाचे वातावरण तणावपूर्ण झाले. बीबी (BB) नावाचा एक राज्य नागरी सेवक (State Civil Servant – ASN) जमावाच्या क्रोधाला बळी पडण्यापासून थोडक्यात बचावला.

आम्हाला haijakarta.id या वेबसाईटवरील एका लेखातही व्हिडीओमधील स्क्रीनशॉट मिळाले.

https://haijakarta.id/viral-mobil-mewah-diduga-milik-pejabat-dirusak-massa-demo-dpr

तर या लेखात म्हटले होते की, २५ ऑगस्ट २०२५, सोमवार रोजी इंडोनेशियाच्या संसद भवनासमोर आंदोलन झालं. या आंदोलनादरम्यान लोकांनी एक महागडी कार फोडली. ही ह्युंदाई पॅलिसेड (Hyundai Palisade) कार होती. आंदोलकांनी दगड मारून ती कार नासधूस केली. ही घटना जकार्तामधल्या सेनायन भागातील जालान गाटोट सुब्रतो रस्त्यावर घडली.

आम्हाला एका यूट्यूब चॅनेलवरदेखील हा व्हिडीओ मिळाला आणि या घटनेबद्दलचा एक अहवाल ‘Waspada TV’ वर मिळाला.

निष्कर्ष – इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सरकारी कर्मचाऱ्याला लोकांच्या क्रोधाचा सामना करावा लागला आणि तो थोडक्यात वाचला. पण, हा व्हिडीओ बिहारमधील आहे, असा सांगून शेअर केला जात आहे; परंतु व्हायरल केला जाणारा दावा दिशाभूल करणारा आहे.