Bihar Assembly Elections Result Protest Viral Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसली; ज्यात असा दावा केला गेला होता की, हा व्हिडीओ नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांचा आहे.

पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ अलीकडचा नसून त्याचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. त्याऐवजी, हा व्हिडीओ प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या गर्दीचा आहे. त्यामुळे, व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.

काय होत आहे व्हायरल?

‘Sanatani Congress’ नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ त्यांच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला.

इतर युजर्सनीही अशाच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे.

तपास

आम्ही व्हायरल व्हिडीओमधून काढलेल्या की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला; त्यामुळे आम्हाला अशा अनेक पोस्ट्स मिळाल्या.

या पोस्ट्समध्ये लोक आसामचे प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे दिसत आहे.

या पोस्ट्समध्ये नमूद केले आहे की, व्हिडीओ गायक झुबिन गर्ग यांच्या अंत्ययात्रेतील गर्दीचा आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सप्टेंबर महिन्यात पोस्ट करण्यात आला होता.

हेच दृश्ये इशाणी दास नावाच्या इंस्टाग्राम युजरने २२ सप्टेंबर रोजी पोस्ट केले होते.

निष्कर्ष – प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीचा एक जुना व्हिडीओ आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बिहारमधील अलीकडचा आहे असे म्हणून शेअर केला जात आहे; त्यामुळे व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.