Dance video : मुलगी ही वडिलांच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती असते. तिचं लहानपण, तिचा हात धरून चालणं, तिचं हळूहळू मोठं होत जाणं हे पाहताना वडिलांचं मन आनंदानं आणि अभिमानानं भरतं आणि जेव्हा तीच मुलगी लग्नासाठी तयार होते, तेव्हा वडिलांच्या मन हळवं होऊन जाते. आठवणी, प्रेम आणि हलकंसं दुःख या सगळ्या भावना मनात एकत्र येऊ लागतात. लग्नाच्या दिवशी वडील आणि मुलीचं नातं आणखी उजळून दिले. त्यांच्यातील प्रेम आणि जिव्हाळा स्पष्ट दिसतो आणि वडील तिच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतात.
लग्न म्हटलं की भावना, आनंद आणि कुटुंबाच्या आठवणी यांचा सुंदर संगम असतो. त्यातही मुलीचं लग्न म्हणजे वडिलांसाठी खूप खास आणि भावनिक क्षण. पण, या लग्नात एका वडिलांनी फक्त भावना नाही तर त्यांची जबरदस्त ऊर्जा, शैली आणि छान डान्सच्या स्टेप्स करून सगळ्यांना थक्क झाले.
लग्नाच्या सायंकाळी त्यांनी स्टेजवरून उतरताच ज्या स्टेप्स दाखवल्या ते पाहून सर्व नातेवाईक आणि पाहुणे सगळेच थक्क झाले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे आणि लोक त्यांचं खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ मुलीच्या लग्नातील संगीत सोहळ्याचा आहे. साधारणपणे वडिलांचा डान्स म्हणजे काही साधे स्टेप्स किंवा मुलीसाठी केलेला छोटासा परफॉर्मन्स अशीच अपेक्षा असते. पण, या वडिलांनी मात्र सगळ्यांना थक्क करत स्टेजवर अशी एनर्जी दाखवली की सगळ्यांच्या तोंडातून एकच शब्द निघाला, “वा!”
पाहा व्हिडिओ
व्हिडीओमध्ये वडील चित्रपट एबीसीडीमधील एका प्रसिद्ध गाण्यावर परफॉर्म करताना दिसतात. गाणं सुरू होताच त्यांनी एकदम प्रोफेशनल डान्सरप्रमाणे स्लो-मोशन, लॉकिंग, पॉपिंग आणि मॉडर्न स्टाईलचा सुंदर मिलाफ असलेले स्टेप्स दणक्यात सादर केले. त्यांची चाल, पावले, आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरील हास्य सर्वकाही बेस्ट होते!
स्टेजच्या बाजूला उभी असलेली मुलगी आनंदाने ओरडत होती. तिच्या डोळ्यात अभिमान होता आणि चेहऱ्यावर कौतुकाचे हास्य होते. पाहुण्यांनीही ओरडून, टाळ्या वाजवून आणि त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो क्षण कैद करून आपला आनंद व्यक्त करताना दिसले. अनेकांना तर यावर विश्वास ठेवायला कठीण जात होतं की हा डान्स एका साध्या, प्रेमळ वडिलांचा आहे; कोणत्याही क्लासचा किंवा प्रोफेशनल ट्रेनिंग नाही.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला आहे. “कोणत्याही वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात असा डान्स करायला आवडेल, पण धाडस सगळ्यांमध्ये नसतं!” “वडिलांच्या एनर्जीला सलाम!” तर एकाने म्हटले “स्टेप्स बघून वाटतंय ते वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करत होते.” तर दुसऱ्याने म्हटले, “या वडिलांनी तर पूर्ण महफिलच लुटली!” काहींनी लिहिलं “हा फक्त डान्स परफॉर्मन्स नाही, एका मुलीवरील प्रेमाची भावना आहे” तर काही जण म्हणतायत—“अशा क्षणांमुळेच वडील-मुलीचं नातं जगातलं सर्वात सुंदर वाटतं.”
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इंस्टाग्राम wonderzwork अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.हा व्हायरल व्हिडीओ फक्त डान्सचा नाही, तर वडिलांच्या निरागस प्रेमाचा, मुलीच्या या लग्नातील भावनिक क्षणांचा आणि कुटुंबातील आनंदाचा अस्सल पुरावा आहे.
