सध्या दोन मुलींच्या मैत्रीचा किस्सा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यातील दोघींची मैत्री इतकी घट्ट आहे की, त्यांना आता कोणी वेगळं करू शकत नाही, या दोघींचा घटस्फोट झाला असून त्या आता नव्या जोडीदाराच्या शोधात आहेत. मारिसा बेकर (३१) आणि पॅटी कुलाक (२८) अशी या मैत्रिणींची नावं आहेत. दोघी पतीसोबत विभक्त झाल्यानंतर आता एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. पण दोघींनी आता नव्या जोडीदारासाठी एक भलतीच अट ठेवली आहे. जी अट पूर्ण करणारी व्यक्तीच त्यांचा जीवनसाथी बनेल.
या दोघींची मैत्री पाहून अनेकदा लोक त्यांना लेस्बियन समजतात. पण तसे नसून या दोघी दु:खाच्या वेळी एकमेकांना भेटल्या आणि एकमेकींना खूप साथ दिली. आता या दोघी एकाच घरात राहतात. पण आता या नव्या व्यक्तीसोबत डेटवर जाण्याचा विचार करत आहेत. पण त्यांच्यासोबत डेटवर येणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांनी एक अट ठेवली आहे, ही अट म्हणजे, जो कोणी त्यांना डेट करेल त्याला दोघींची मैत्री स्वीकारावी लागेल, त्या एकमेकांची साथ कधीच सोडणार नाहीत. म्हणजे कोणाशीही नातं जोडल्यानंतरही त्या एकाच घरात एकत्र राहणार, यावर पॅटी म्हणते की, जो कोणी आम्हाला डेट करेल तो दोघांचा बॉयफ्रेण्ड असेल पण तो कधीच आम्हाला वेगळं करण्याचा विचार करणार नाही.
ट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच
‘मिरर’च्या रिपोर्टनुसार, पॅटी २०२१ साली मारिसाचा वाढदिवस असताना तिच्या पतीपासून विभक्त झाली. त्या वेळी मारिसाने पॅटीला मानसिकदृष्ट्या खूप साथ दिली होती. यानंतर काही दिवसांनी मारिसाही तिच्या पतीपासून वेगळी राहू लागली. या वेळी दोघींचे पतीसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर त्या एकत्र राहू लागल्या.
दोघींच्या या मैत्रीवर मारिसा म्हणते की, आम्ही दोघी एकमेकींसोबत आनंदी असतो, दोघी मुक्त पक्ष्यांसारख्या एकत्र राहतो, आता आम्हाला ते स्वातंत्र्य मिळाले आहे, जे आम्हाला आमच्या पतींसोबत कधीच मिळाले नाही. आम्हाला दोघींना एका मुलासोबत डेटवर जायचं आहे, पण ज्याला कोणाला आमची अट मान्य असेल आणि आम्हाला डेट करायचं असेल त्याला आमच्याकडून पॅकेज डील मिळेल.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.