‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना करोनाकाळात जास्त वापरण्यात आली. लॉकडाउन असल्याने कोणालाच घराबाहेर पडणे शक्य नव्हते, त्यामुळे सर्वांच्या कामाचे स्वरूप बदलले. सर्वांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याचा पर्याय देण्यात आला. आता सर्व निर्बंध काढून टाकल्यानंतर पुन्हा ऑफिसमधून कामाला सुरूवात झाली आहे. पण अजुनही बऱ्याच कंपन्यांकडुन ‘वर्क फ्रॉम होम’ हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे अनेकजण घरूनच काम करतात, पण यामधली मुख्य अडचण म्हणजे ऑफिसमध्ये असणारा सेटअप घरी उपलब्ध नसतो. त्यासाठी नवा सेटअप विकत घेतला तर घरात जागेची अडचण होण्याची शक्यता असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वर्क फ्रॉम होम’साठी गरजेचा असणारा कामाचा सेटअप आणि जागेची अडचण या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ नक्की मदत करू शकतो. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने बेडमध्येच कामाचा सेट अप बनवला असल्याचे दिसत आहे. या भन्नाट कल्पनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कल्पनेचे कौतुक करत उदयोगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ९० हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. पाहूया ‘वर्क फ्रॉम होम’ साठी तयार करण्यात आलेला हा सेटअप.

Viral Video : मुलासाठी आईचा भन्नाट जुगाड; हर्ष गोएंकांनी व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा : फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला लॅपटॉप पण आले भलतेच काही; तक्रार नोंदवण्यासाठी शेअर केलेले फोटो झाले व्हायरल

बेडमध्येच बनवलेला हा कामाचा सेटअप नेटकऱ्यांना आवडला असून, हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harsh goenka shares innovative idea of work from home setup inside bed video goes viral pns