पाश्चात्य संस्कृतीचे भारतात अनेकांना आकर्षण वाटते त्यामुळे परदेशात जाऊन शिकण्याचा किंवा नोकरी करण्यासाठी अनेक तरुण-तरुणी उत्सुक असतात. दक्षिण कोरिया हा आधुनिक शिक्षण, प्रगत तंत्रज्ञान आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी ओळखला जातो. कोरियन संस्कृती, खास करून K-Drama आणि K-Pop मुळे भारतातील तरुणांमध्ये कोरियाची आकर्षण वाढत आहे, ज्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधातले युवक तिथे जात आहेत. कोरियन भाषा शिकणे तिथल्या जीवनात आणि कामात यशस्वी होण्यासाठी गरजेचे असते, आणि तिथल्या कडक सामाजिक नियमांमध्ये जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. भारतीयांसाठी तिथे शैक्षणिक संधी, आयटी, अभियांत्रिकी आणि शिक्षण क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, तसेच भारतीय समुदायही तिथे वाढत असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहपूर्ण वातावरण तयार होत आहे.
कोरियाची खाद्यसंस्कृती आणि भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये फरक असल्याने अनेक तरुण-तरुणींना तेथे राहताना संघर्ष करावा लागतो. कोरिया हा मुख्यतः मांसाहारी आणि समुद्री अन्नावर आधारित देश असून, तिथल्या जेवणात मासे, डुकराचे मांस(Pork) आणि गोमांस (Beef) आणि सॉसेजेसचा मोठा वापर होतो, तर भारतीय संस्कृतीत शाकाहारी खाद्यपदार्थांचे प्रमाण जास्त आहे. भारतात मासंहार देखील केला जातो पण त्यामध्ये मुख्यत: अंडी, चिकन, मटण, मासे खाल्ले जातात पण भारतात डुकराचे मांस(Pork) आणि गोमांस (Beef) खाल्ले जाते नाही त्यामुळे शाकाहारी असणाऱ्या भारतीय तरुणींना कोरियात योग्य आणि स्वादिष्ट शाकाहारी जेवण मिळवणे कठीण जाते. कोरियन जेवणात भेंडी, डाळी आणि इतर पारंपरिक भारतीय भाज्या कमी उपलब्ध असल्यामुळे त्यांना रोजच्या आहारात तडजोड करावी लागते, ज्यामुळे त्यांना खाण्याच्या सवयी आणि पोषण यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
दक्षिण कोरियामध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेने शाकाहारी म्हणून कराव्या लागणार्या संघर्षांबद्दलचा व्हिडिओ शेअर केला जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खुशीने तिच्या इंस्टाग्राम रीलमध्ये सांगितले की, “डुकराचे मांस(Pork) आणि गोमांस (Beef) यासारखे स्थानिक कोरियन पदार्थ ती येथे का खाऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे.
एका कोरियन मैत्रिणीशी बोलताना खुशी सांगते की, “मी भारतीय असल्याने, माझ्या धर्मामुळे मी डुकराचे मांस आणि गोमांस खाऊ शकत नाही. चिकन खाणे ठीक आहे, पण लहानपणापासून, माझ्या आईने मला कधीही ते खायला लावले नाही, म्हणून मी आता ते खाऊ शकत नाही. पण मी अंडी खाल्ली आहेत त्यामुळे मी येथे अंडी खाऊ शकते.”
ती पुढे सांगते की,”ती दक्षिण कोरियामध्ये फक्त भाज्या खाते. “मी फक्त भाज्या खाऊन इथे टिकून हे जेव्हा लोकांना समजते तेव्हा त्यांना धक्का बसतो. माझ्यासाठी हे कठीण आहे कारण कोरियामध्ये फारसे शाकाहारी पर्याय उपलब्ध नाहीत.” ती पुढे सांगते, “मी कॅफेमध्ये जाते, पण मला कॉफीही आवडत नाही, म्हणून मी तीही पिऊ शकत नाही. मला कोरियामध्ये बेकरी उत्पादन आवडतात. ब्रेड खरोखर खूप चविष्ट असतात. पण ते खूप गोड आहे.” असेही खुशी पुढे सांगते.
व्हिडिओ शेअर करताना खुशीने लिहिले, ” मला भिंडी खायची आहे. मी भेंडी खाण्यासाठी मरते(तीव्र इच्छा होत) आहे”
व्हिडिओ येथे पाहा….
व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत मुलीला विचारले की,मुली तू तिथे काय खाऊन जगते? म्हणजे शाकाहारी म्हणून तिथे तू काय खाते? दुसऱ्याने सांगितले की, जे लोक शाकाहारी आहेत त्यांना इतरांबरोबर वावरताना अडचणी येतात का? कारण BBQ रेस्टॉरंटमध्ये जेवणे हा त्यांच्या कल्चरचा मोठा भाग आहे. त्यामुळे शाकाहारी लोकांना सहकारी किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर असताना एकटे पडल्यासारखे वाटते का?
आणखी एकाने सांगितले की, “मी भारतीय आहे पण मी शाकाहारी नाही त्यामुळे मी जगात कुठेही कोणत्याही अडचणीशिवाय राहू शकतो.”