सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात त्यापैकी काही थरारक असतात तर काही मनमोहक. बिबट्याच्या शिकारीचे अनेक अंगावर काटा आणणारे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण बिबट्याचा मनमोहक व्हिडीओ क्वचितच पाहिला असेल. आयएएस अधिकारी संजय कुमार यांनी अलीकडेच राणा नावाच्या नर बिबट्याचा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे जो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये राणा बिबट्या पाठवठ्यावर येऊ शांतपणे पाणी पिताना दिसत आहे. हा एक दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बिबट्या सामान्यत: गुप्तपणे वावरणारा आणि लाजाळू असतात, पण उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे भरदिवसा पाणी पिण्यासाठी बिबट्या पाण्यावठ्यावर आलेला दिसत आहे. हा व्हिडीओ झालाना लेपर्ड सफारी, जयपूर येथे स्थानिक मार्गदर्शकांद्वारे शुट केला आहे. व्हिडिओमध्ये ‘राणा’ नावाचा एक प्रसिद्ध नर बिबट्या शांतपणे पाणी पिताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, राणाची शक्तिशाली आणि शरीरयष्टी प्रकट करण्यासाठी कॅमेरा झूम इन केला जाततो. असा क्षण कॅमेऱ्यात कैद होणे अत्यंत असामान्य गोष्ट आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत.

हेही वाचा – “पुणेकरांचा नादखुळा!” पावसाचा आनंद लुटणाऱ्या पुणेरी तरुणाचा व्हिडीओ बघाच, पोटधरुन हसाल

हेही वाचा – “जय शिवराय!”, हिरव्यागार शेतात साकारली शिवबाची प्रतिमा; शेतकऱ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा

अनेकांनी बिबट्या राणाच्या सौंदर्याची प्रशंसा केली. व्हिडिओने ऑनलाइन सर्वांचे लक्ष वेधले आहे. वन्यजीव प्रेमी आणि प्राणीप्रेमी हे दुर्मिळ दृश्य पाहून रोमांचित झाले आहेत. यासारखे व्हिडिओ वन्य प्राण्यांच्या विश्वातील अविश्वसनीय विविधतेबद्दल गोष्टी दर्शवतात. बिबट्याते संरक्षण करण्यासाठी संवर्धन प्रयत्नांच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्यास मदत करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias officer posts close up video of leopard drinking from waterhole amid scorching heat snk