महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळ्याला यंदा ३५१ वर्ष पूर्ण होत आहे. दरवर्षी ६ जून रोजी रायगडावर दिमाखदार सोहळा पार पडतो आणि शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा केला जातो. शिवप्रेमी मोठ्या संख्येने किल्ल्यांना भेट देतात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आणि त्यांचे विचार आत्मसात करून अनेकजण हा दिवस साजरा करताना दिसतात. शिवराज्यभिषेक सोहळ्याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान एका शेतकऱ्याच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शेतकऱ्यांना आपल्या शेतात धान्य पेरून छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा तयार केली आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून शिवभक्त थक्क झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आणि त्यांना मानणारे कित्येक लोक आहेत. अशाच एका शिवप्रेमी तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने मानाचा मुजरा केला आहे. इंस्टाग्रामवर kdvikh (कुणाल विखे) नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शेतामध्ये हिरव्या गवताने साकरलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसत आहे. पण ही प्रतिमा तयार करण्यासाठी या शेतकरी तरुणाला कित्येक दिवस मेहनत घ्यावी लागली आहे.

हेही वाचा – ‘पंचायत’ वेबसिरीजमधील प्रसिद्ध फुलेरा गाव पाहिले का? Viral Video पाहून चाहते झाले खूश, म्हणाले, “रस्ता….”

व्हिडीओमध्ये दिसते की, काही दिवसांपूर्वी तरुणाने मोकळ्या शेतात पांढऱ्या रांगोळीने छत्रपती महाराजांचे चित्र रेखाटले आहे. या चित्रानुसार एक-एक बी पेरले. दिवस-रात्र काळजी घेऊन तरुणाने हे हिरवेगार शेत तयार केले आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सहज दिसते आहे. व्हिडीओ पाहून शिवभक्त मंत्रमुग्ध झाले आहे.

हेही वाचा – एलॉन मस्कनं ॲमेझॉनच्या जंगलात पोहचवलं इंटरनेट, आदिवासी तरुणानां लागलं पॉर्न पाहण्याचं वेडं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणाने आपल्या अनोख्या कौशल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा दिला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. अनेकांनी तरुणाच्या मेहनतीचे कौतूक केले आहे तर काहींनी व्हिडीओवर”जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय” अशा कमेंट केल्या आहेत.