Indian Railway Viral Video : सोशल मीडियावर भारतीय रेल्वेसंदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. सध्या भारतीय रेल्वेमधील असाच एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे; ज्यात रेल्वे पोलीस एका प्रवाशाला जबरदस्तीने पकडून मारहाण करीत ओढत नेत असल्याचे दिसत आहे. ट्रेनमधील एसी बंद असल्याची तक्रार त्याने रेल्वेकडे केली होती. पण, त्यावर काहीच कारवाई न झाल्याने प्रवाशाने ट्रेनची साखळी ओढली आणि ट्रेन थांबवली. या प्रकारामुळे व्हिडीओनुसार रेल्वे पोलिसांनी संताप व्यक्त करीत प्रवाश्याला मारहाण करत बाहेर काढल्याचे सांगितले जाते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रेनची साखळी ओढल्याने पोलिसांकडून मारहाण

हा व्हिडीओ लखनौमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मोठ्याने ओरडतेय की, ही उघडपणे गुंडगिरी आहे. त्याने एसी काम करीत नसल्याची तक्रार करताच संपूर्ण रेल्वे विभागाने त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आला, त्यानंतर ‘जागो पब्लिक जागो’ असं म्हणत ती व्यक्ती अखिलेश यादव यांचा नावाने नारेबाजी करु लागली. यावेळी काही पोलीस सीटवर बसलेल्या एका व्यक्तीला जबरदस्तीने पकडून ओढत नेत, ट्रेनमधून बाहेर ढकलताना दिसत आहेत. तक्रार करूनही कोणतीही पावलं न उचलली गेल्याने त्या प्रवाश्याने साखळी ओढल्याचे मत इतर प्रवासी व्यक्त करत आहेत.

“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा

टीटी सर, तुमच्यात माणुसकी नाही, प्रवाश्याचा संताप

व्हिडीओमध्ये पुढे काही प्रवासी टीटीबरोबर वाद घालतानाही दिसत आहेत, जिथे काही लोक टीटीला विचारताना दिसत आहेत की, तुम्ही संपूर्ण प्रकरण तक्रार वहीत का लिहिले नाही. तक्रार करूनही तोडगा न निघाल्याने प्रवाशाने रेल्वेस्थानकातच ट्रेनची चेन ओढली. टीटी सर, तुमच्यात माणुसकी नाही, तुम्हाला वाचवण्यासाठी त्याने असे केले, तुम्ही हे ध्यानात घ्यायला हवे होते.

@ItsKhan_Saba नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, त्याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यावर युजर्स संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय की, मोदी है तो मुमकिन आहे. आणखी एका युजरने लिहिलेय की, रेल्वे हुकूमशहाप्रमाणे वागत आहे, या पोलिसांना त्वरित हटवावे. तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, जर तुम्ही पैसे दिले असतील, तर एसी खराब का आहे?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway police beat up a man who pulled the train chain after complaining about ac malfunction irctc viral video sjr