दिवाळी आली की, प्रत्येकाच्या घरात सजावट, फराळ आणि भेटवस्तूंची धामधूम असते आणि प्रत्येक जण त्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो; पण आता विविध कंपन्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करीत असतात आणि त्यासाठी त्या कुठे कमी पडणार नाहीत हे पाहत असतात. गूगलच्या हैदराबाद ऑफिसमध्ये झालेल्या दिवाळी सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाले आहेत आणि ते पाहून लोक म्हणतायत“अरे बापरे, आमच्याकडे असं ऑफिस का नाही?”
पूर्ण ऑफिस रंगीबेरंगी दिवे, सुंदर रांगोळ्या आणि फोटो काढण्यासाठी केली गेलेली गोंडस सजावट यांनी झगमगले होते. पाहिलं तर वाटावं की, हे ऑफिस नाही, तर एखादं फाइव्ह स्टार हॉटेल आहे. काही कर्मचाऱ्यांनी तर विनोद केला, “हे आमच्या ऑफिससारखं दिसत नाही, ते Pinterest वरील चित्रासारखं दिसतंय!
पाहा व्हिडिओ
या व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की, गूगलने केवळ जागा सजवली नाही, तर कर्मचाऱ्यांसाठी एक मजेदार चित्रकला सत्रदेखील आयोजित केले आहे. रंगांशी खेळताना सर्वांना आराम करण्याची संधी मिळाली. नंतर सगळे जण ‘हौजी’ खेळले. नंबर लागताच कुणी ओरडत होतं, तर कुणी हातावर हात आपटत हसत होतं. दिवाळीत खाणंपिणं तर आलंच. गूगलच्या कॅन्टीनमध्ये महाराष्ट्र, पंजाब, बंगाल आणि अगदी दक्षिणेकडील विविध ठिकाणच्या चवींच्या मेजवानी होत्या. त्याशिवाय आठवणींसाठी एक पोलरॉइड फोटो बूथ होता – जिथे प्रत्येकाने सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्याचा आनंद घेतला.
जेव्हा हा व्हिडीओ इंटरनेटवर आला तेव्हा त्यावर अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पडू लागला. कोणीतरी लिहिले- “अरे, माझ्या फीडवरून निघून जा. माझा मूड खराब आहे!” तर कोणीतरी थेट विचारले – “तुम्हाला इथे नोकरी कशी मिळते?” एकाने तर थट्टेत लिहिले- “येथे सुरक्षा रक्षकांनाही बी.टेक. असणं आवश्यक आहे.” एका व्यक्तीने तर बिग बॉसच्या शैलीत म्हटले- “मला दु:ख होत आहे. खरंच, गूगलचं हे दिवाळी सेलिब्रेशन पाहून आपल्यालाही असं ऑफिस हवं, असं वाटतं.