दिल्लीहून तिरुपतीला निघालेल्या ट्रेनच्या एसी कोचमध्ये झुरळांचा मुक्त संचाराने त्रस्त झालेल्या प्रवाशाला रात्र जागून काढावी लागली. एसी कोचमधील ही स्वच्छता आणि देखभालीमधील रेल्वेची उदासीनता पाहून प्रवाशाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रवाशाने आपल्या सीटभोवती झुरळ फिरत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विटर यूजर अतीफ अलीने एसी कोचमध्ये झुरळ फिरत असल्याचा फोटो ट्विटरवर शेअर करत तक्रार केली आहे. ज्यावर भारतीय रेल्वे सेवेच्या अधिकृत हँडलने उत्तर दिले आहे.

गाडी क्रमांक १२७०८ A/C कोचमध्ये आम्ही झोपेत असताना आमच्या अंगावर झुरळं फिरत होती, कुठे आहे रेल्वेची स्वच्छता? असा सवाल आतीफ अलीने आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. त्याने एक फोटो देखील शेअर केला आहे ज्यात बेडवर आणि ट्रेनच्या भिंतीवर झुरळ फिरताना दिसत आहेत.

हा फोटो ७ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आला आहे. ज्याला आत्तापर्यंत २०० हून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेल्वे सेवेच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही त्याला उत्तर दिले आहे.

भारतीय रेल्वेने दिले असे उत्तर

रेल्वे सेवेने लिहिले की, “आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया प्रवासाचे तपशील (PNR/UTS No.) आणि मोबाईल क्रमांक आम्हाला DM द्वारे शेअर करा. तुम्ही तुमची समस्या थेट http://railmadad.indianrailways.gov.in वर देखील मांडू शकता. किंवा जलद निवारणासाठी 139 डायल करा.

रेल्वेची सर्वात वाईट अवस्था, युजर्सच्या प्रतिक्रिया

रेल्वे प्रवाशाच्या या ट्विटवर एका व्यक्तीने लिहिले की, तू लकी आहेस, मला कंपनी म्हणून उंदीर होते. यावरच दुसऱ्या एका युजरने लिहिले की, रेल्वेची अवस्था सर्वात वाईट आहे. हे कधीही पाहिले नाही. याशिवाय तिसऱ्या एका युजरने तुम्ही भारतीय रेल्वेच्या या एसी कोचमध्ये प्रवास करण्याचे धाडस कराल का? असा सवाल केला आहे. तर चौथ्या युजरने, हे एक भयानक स्वप्नासारखे आहे, असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc news nightmare indian railway passenger shares pic of cockroaches in coach sjr