सोशल मीडियावर उत्तम कौशल्य दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर जंगलाप्रमाणे वातावरणात निर्मिती करण्यात आल्याचे दिसत आहे. या जंगलामध्ये काही प्राणी आणि पक्षीही दिसत आहेत. पण हे प्राणी, पक्षी नसुन काही कलाकारांनी हे रूप साकारलेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा व्हिडीओ एका ‘टॅलेंट हंट शो’मधील आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला एक घुबड स्टेजवर बसलेले दिसत आहे. पण काही सेकंदातच हे घुबड नसुन एका माणसाने हे रूप साकारले आहे, हे स्पष्ट होते, अशाप्रकारे अनेक प्राणी या स्टेजवर हुबेहुब साकारण्यात आले आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: कुत्र्याला जेवू घालण्यासाठी नवरीने चक्क…; नेटकऱ्यांची मनं जिंकणारा Viral Video पाहिलात का?

व्हायरल व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी कमेंट करत या कौशल्याचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is that animal or a person viral video shared by anand mahindra will leave you in question pns