Crocodile vs Lions fight: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हसवणारे, तर कधी अंगावर काटा आणणारे. त्यातही जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांना नेहमीच थक्क करतात. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात दिसतं की, एकटी मगर चार सिंहांना भिडते.
चार भुकेले सिंह आणि एकटी मगर! अशा प्रसंगात शेवट काय झाला असेल याचा विचार करूनच काळजाचा ठोका चुकतो. २२ सेकंदांपर्यंत चाललेली ही झुंज पाहून तुम्ही थक्क व्हाल… पुढे मात्र घडलं असं काही की, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.”
होय, चुकीचं वाचलं नाहीत तुम्ही. एकटी मगर, आणि समोर थेट चार चार सिंह. व्हिडीओ पाहिल्यावर कुणाच्याही अंगावर काटा येईल. सुरुवातीला मगर जबरदस्त धैर्य दाखवीत सिंहांना तोंड देते. मगर मोठा जबडा उघडून वारंवार सिंहांवर झेप घेते. पाहणाऱ्यालाही वाटतं – “ही मगर कदाचित सिंहांना पळवून लावेल की काय?”
पण जसजसा व्हिडीओ पुढे जातो, तसतसं दृश्य बदलू लागतं. सिंहांची ताकद वाढत जाते आणि मगरीची झुंज हळूहळू कमी पडते. तरीदेखील मगर हार मानत नाही. २२ सेकंदांपर्यंत एकटी मगर सिंहांना दमदार टक्कर देते. मात्र, अखेर चार सिंह त्या मगरीची कोंडी करतात. एक सिंह तिच्या शेपटीला धरतो, दुसरा तिच्या जबड्याला पकडतो आणि उरलेले दोन सिंहांनी तिला दणका देताच परिस्थिती पालटते.
अगदी त्या क्षणापासून सुरू होते सिंहांची पार्टी! चारही सिंह मिळून, त्या मगरीला लोळवत नेतात. मग आकार आणि ताकद यांच्या तुलनेत सिंहांपेक्षा कमकुवत ठरलेल्या मगरीला तग धरणं अशक्यच ठरतं. पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यानं दिलेली लढत लोकांना चांगलीच भावली आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @latestkruger या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय – ‘चार सिंहांनी जिवंत मगरीवर ताव मारला. पोटभर जेवणानंतर पाणी प्यायला गेलेल्या सिंहांच्या वाटेत मगर आली आणि खेळ सुरू झाला.’
आजवर या व्हिडीओला पाच लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत; तर १५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. कमेंटमध्ये तर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं – “निसर्ग स्वतःचं संतुलन राखण्यासाठी असं करतो. जर हे सिंह पाण्यात उतरले असते, तर तेच शिकार झाले असते.” तर दुसरा म्हणतो – “मगरीनं शेवटपर्यंत लढाई केली, तेच खरं धैर्य आहे!”
येथे पाहा व्हिडीओ
खऱ्या अर्थानं हा व्हिडीओ निसर्गाचं रूप दाखवतो. जिथे कोणीही कायम जिंकत नाही… कधी सिंह वरचढ ठरतो, तर कधी मगर. आणि हीच खरी जंगलाची भाषा!