Killy Paul’s Dance: बॉलीवूडमधील नवी, जुनी गाणी सतत व्हायरल होत असतात. मग काय सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केले गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल एका भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने आता ‘पीलिंग्स’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेहमीप्रमाणे किली पॉल पारंपरिक वेशात नसून पँट आणि टी-शर्टमध्ये दिसत आहे. यावेळी तो ‘पुष्पा २’ मधील‘पीलिंग्स’ गाण्यावर डान्स करीत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. यावेळी किली पॉल खरंच खूप सुंदर डान्स करताना दिसतोय. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.
इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर दहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर करतोयस डान्स”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुझा डान्स मला आवडला”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स किली”; तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “सुपर सुपर सुपर डान्स”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd