Leader Selfie Fail Viral Video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी स्टंट, कधी जुगाड, कधी डान्स, कधी भांडण, तर कधी कुठली विचित्र घटना. अशाच एका अजबगजब प्रकाराचा एक VIDEO सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल आणि थोडक्यात मोठी दुर्घटना टळली असंही वाटेल.

नेतेमंडळींचे सेल्फीप्रेम नेहमी चर्चेचा विषय असतो; पण यावेळी मात्र हे सेल्फी घेणं इतकं महागात पडलं की, तो क्षण अक्षरशः ‘डुबकीचा’ क्षण ठरला. एका स्वागत कार्यक्रमात नेते आणि त्यांचे समर्थक तात्पुरत्या काठ्यांच्या पुलावर उभे होते. वातावरणात जल्लोष होता, चेहऱ्यावर हास्य होतं आणि कॅमेऱ्यात पकडण्यासाठी परफेक्ट फ्रेम शोधली जात होती. पण पुढच्याच क्षणाला घडली अशी काही घटना, जी मोबाईलमध्ये सेल्फीऐवजी थेट व्हायरल व्हिडीओ बनून गेली. नेमकं काय घडलं? संपूर्ण प्रकार पाहा खाली दिलेल्या जबरदस्त व्हिडीओमध्ये …

घटना नेमकी काय?

या व्हायरल VIDEO मध्ये दिसतंय की, एक नेता आपल्या काही समर्थकांसह एका छोट्या नदीवर बनवलेल्या कच्च्या तात्पुरत्या पुलावर उभे आहेत. काही जणांच्या गळ्यात फुलांचे हार आहेत, वातावरण जणू स्वागताचे आहे. यावेळी एक समर्थक त्या पुलावर उभे राहून मोबाईल समोर करीत सर्वांबरोबर एक परफेक्ट सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत असताना दिसतो. आणि अगदी त्याच क्षणी… अचानक धाड आवाज होतो आणि तो काठ्यांचा पूल तुटतो.

नेता आणि समर्थक एकत्रच धडाधड खाली पडतात. पण सुदैवाने नदी फार खोल नाही आणि पाण्याचा प्रवाहही जोरदार नसल्याने कोणालाही मोठ्या प्रमाणात इजा झालेली नाही. पण या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @sunnny7009 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, बातमी लिहेपर्यंत त्याला ५१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोणीतरी लिहिलं, “मिशन पूर्ण झालं”, तर दुसऱ्यानं म्हटलं, “कंगाल पाकिस्तानचा ओव्हरब्रिज बघा”,
तिसऱ्यानं मिश्कीलपणे लिहिलं, “शेवटी एक संस्मरणीय सेल्फी मिळालीच”, तर अनेकांनी हसणाऱ्या इमोजीचा पाऊस पाडला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

एकूण काय, तर सेल्फीच्या नादात नेता आणि त्यांच्या समर्थकांची चांगलीच गोची झाली आहे. पण, सुदैवानं कोणीही गंभीर जखमी न झाल्यामुळे हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर हसण्याचा आणि शेअर करण्याचा विषय बनला आहे. तुम्ही अजून पाहिला नसेल, तर एकदा पाहाच कारण “सेल्फी का चक्कर है बाबू भैया”….