Leopard Mother vs Lioness Fight: जंगलाचं आयुष्य जितकं देखणं आणि मोहक दिसतं, तितकंच ते संकटांनी आणि धोक्यांनी भरलेलं असतं. प्रत्येक क्षणी शिकार करणारा आणि शिकार होणारा यांच्यातील संघर्ष इथे सुरू असतो. पण, प्रसंग जेव्हा आपल्या लेकरांवर येतो तेव्हा कोणताही प्राणी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही आपल्या पिल्लांसाठी लढतो आणि जर तीच गोष्ट एखाद्या आईची असेल, तर तिचं धाडस पर्वतासारखं उभं राहतं.

असंच काहीसं थरारक दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलंय. व्हिडीओमध्ये एक मादी बिबट्या आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी सिंहिणीसमोर उभी ठाकते. जंगलातील दोन ताकदवान प्राणी एकमेकांना भिडतात आणि पुढे काय होतं हे पाहून लोक अवाक् झालेत.

सिंहिणीची नजर बिबट्याच्या पिल्लांवर

एका जंगलात मादी बिबट्या आपल्या छोट्या पिल्लांसोबत निवांत होती. पण, त्याचवेळी एका भुकेल्या सिंहिणीची नजर तिच्यावर पडली. सिंहिणीच्या नजरेतून स्पष्ट दिसत होतं की तिचं लक्ष्य बिबट्याची पिल्लं आहेत. पण, सिंहिणीच्या झेपेआधीच आई बिबट्या पिल्लांना आपल्या मागे घेऊन भक्कमपणे उभी राहते. “आईसाठी तिचं मूलच सर्वात मोठं शस्त्र असतं” ही म्हण खरी ठरवणारा प्रसंग होता तो.

थरारक झुंज

सिंहीण ताकदवान असली, तरी मादी बिबट्या कुठे कमी पडत नव्हती. विजेसारख्या वेगवान हालचाली आणि धारदार नखांनी तिने सिंहिणीवर तुफानी हल्ले चढवले. दोघींत जबरदस्त झुंज सुरू झाली. सिंहीण वारंवार झडप घालण्याचा प्रयत्न करत होती, तर मादी बिबट्या मागे हटण्याऐवजी प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देत होती.

हा संघर्ष तब्बल १५-२० सेकंद सुरू राहिला. सिंहिणीने पुन्हा पुन्हा बिबट्याला दूर सारून पिल्लांपर्यंत पोहोचायचा आटोकाट प्रयत्न केला, पण आईच्या शौर्याने तिच्यासमोर प्रचंड भिंत उभी केली होती. आकाराने लहान असूनही आपल्या लेकरांसाठी तिने सिंहिणीला रोखून धरलं.

लोकांनी केलं कौतुक

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील its_jungle_या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारोंनी हा व्हिडीओ पसंत केला असून, कमेंटमध्ये लोक मादी बिबट्याच्या शौर्याचं कौतुक करतायत. अनेकांनी म्हटलं की, “आईला ठाऊक होतं की ती सिंहिणीला फार वेळ थांबवू शकणार नाही, पण तिने आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी ज्या क्षणांचा अवधी मिळवला, तेच तिचं खरं सामर्थ्य आहे.”

येथे पाहा व्हिडीओ

हा प्रसंग पुन्हा एकदा सिद्ध करतो की, जंगल असो वा माणसांची दुनिया आईसाठी तिची लेकरं म्हणजेच तिचं खरं साम्राज्य.