Pakistan viral video: शेजारी देश पाकिस्तान आपल्या विचित्र गोष्टींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या घटनेमुळे पाकिस्तानची संपूर्ण जगात नाच्चकी झाली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही म्हणाल असे काय झालं ? तर ऐका…पाकिस्तानातील लाहोर येथे दिवसा ढवळ्या भर वस्तीत चक्क सिंहाचा वावर पाहायला मिळाला. एवढंच नाहीतर या सिंहाना सर्वांना सळो की पळो करुन सोडलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाकिस्तानमधल्या लाहोर येथे भर दिवसा वस्तीत सिंहाचा सर्रास वावर पाहायला मिळाला, एवढंच नाही तर या सिंहानं समोर दिसेल त्या सर्व नागरीकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी या सिंहानं अक्षरश: एका महिलेवर जोरदार हल्ला करत तिच्या अंगावर मागून झेप घेतली. तो वारंवार तिच्यावर हल्ला करत राहिला, यावेळी स्वत:ला वाचवण्यासाठी या महिलेने प्रतिकार केला मात्र सिंहाच्या ताकदीसमोर तिचं काही चालत नव्हतं. यानंतर एक व्यक्ती आला आणि त्यानं सिंहावर जे मिळेल ते फेकू लागला. यानंतर सिंहानं या महिलेला सोडलं आणि दुसरीकडे पळू लागला. यावेळी सर्वच आपला जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचं दिसत आहे.

माणसांनी जंगलांवर अतिक्रमण केल्यामुळे वाघ, सिंह असे प्राणी मानवी वस्तीत शिरल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. अशातच सध्या पाकिस्तानातला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

पाकिस्तान देश बऱ्याचंदा आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येतो. बऱ्याचंदा तिथले लोकं असं काही करतात की ज्यामुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ alikhanakreal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “सर्वजण पळाले मात्र त्यातल्या एका व्यक्तीमुळे त्या महिलेचा जीव वाचला” तर आणखा एकानं, पाकिस्तानात काय होईल आणि काय नाही हे सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.