एकनाथ शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या ३९ आमदारांनी बंड पुकारल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने मोठ्या उत्साहात राजीनाम्याचा जल्लोष साजरा केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना पेढा भरवून तोंड गोड केलं. बुधवारच्या या घडामोडींनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या नेत्यांची लगबग सुरु असून सध्या मुंबईत भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक सुरु आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गोव्यामधून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी रवाना झालेत. शिंदे गट आणि ९ अपक्ष आमदारांनासोबत घेऊन फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यास तयार आहेत. मात्र हे सारं कधी आणि कसं होणार याबद्दल अद्याप (हे वृत्त प्रकाशित करेपर्यंत म्हणजेच दुपारी तीन वाजेपर्यंत) स्पष्टता नसली तरी विकिपीडियावर मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याचं झळकत आहे.

नक्की वाचा >> “…तर उद्धव ठाकरेंना समर्थन करणाऱ्या त्या १६ आमदारांची आमदारकी धोक्यात येईल”; बंडखोर आमदारांकडून इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र भाजपाच्या या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या ३९ बंडखोर आमदारांच्या गटासोबत जाण्यासंदर्भात आणि सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा सुरु असताना दुसरीकडे काही हौशी समर्थकांनी विकिपीडियावर फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये अपडेटही केलं आहे. म्हणजेच अजून देवेंद्र फडणवीस नेमकी कधी शपथ घेणार याबद्दल स्पष्टता नसताना विकिपीडियावर ते मुख्यमंत्री म्हणून दिसू लागले आहेत. १ जुलै २०२२ पासून फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं विकिपीडियावरील यादीमध्ये दिसत आहे.

नक्की वाचा >> ‘शिंदेंकडे १४४ चं बहुमत नसून ५० आमदार आहेत’ म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “काही किती हुशार…”

विशेष म्हणजे ही अपडेटेड यादी विकिपीडियावर आज म्हणजे ३० जून रोजी म्हणजेच यादीमध्ये नमूद करण्यात आलेल्या दिवसाच्या एक दिवस आधीच दिसत आहे. फडणवीस नेमकी कधी शपथ घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात शिंदे गटाशी बोलून लवकरच भाजपा निर्णय जाहीर करेल असं सांगण्यात आलं आहे.

असं का झालं?
‘विकिपीडिया’ हा इंटरनेटवरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोष आहे. म्हणजेय सोशल नेटवर्किंग साईटवर अकाऊंट असतात त्याप्रमाणे अकाऊंट सुरु करुन कोणालाही या प्लॅटफॉर्मवरील माहितीत भर घालता येते. विकिपीडिया हे विश्वासार्हता असलेलं माहितीचं माध्यम याच कारणामुळे समजलं जात नाही. या माध्यमावरील माहिती खरी असेलच असं नाही. एखाद्या विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी या माध्यमाचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळेच सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातील माहितीबद्दल जसं दिसून येत आहे तसेच येथील अनेक पेजेवर माहितीची पूर्ण पडताळणी न करता अपडेट करतानाही दिसून येतात. ही विकिपीडियाची सर्वात मोठी नराकात्मक बाब आहे.

नक्की वाचा >> “प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसं फोडणाऱ्या, त्यांच्याविरोधात द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल…”

सत्तास्थापनेचं गणित कसं…
भाजपा एकनाथ शिंदे गटातील ३९ शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष ९ अशा ४८ आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्न आहे. असं झालं तर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं. मध्यरात्री सर्व बंडखोर आमदार गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. २२ जून पाहून हे आमदार गुवाहाटीमधील ‘रेडिसन्स ब्लू’ हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. ३० जूनच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर ते काल म्हणजेच २९ जून रोजी गोव्यात दाखल झाले. गोव्याचे मुख्यमंत्री मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास या आमदारांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. सध्या भाजपाकडे १०६ चे संख्याबळ असून ४८ आमदारांच्या मदतीने भाजपाला बहुमताचा १४५ चा आकडा सहज गाठणं शक्य आहे. “एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहोत हे स्पष्टच आहे,” असं पत्रकारांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने शिंदेच्या समर्थनावरच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या गादीवर बसतील असं चित्र दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: List of chief ministers of maharashtra on wikipedia shows devendra fadnavis as cm before he takes oath as chief minister scsg
First published on: 30-06-2022 at 15:15 IST